मसिआ क्रिकेट: ग्रामीण पोलिसांनी फिनिक्स एमआर इलेव्हनला हरवले, विकास नगरकरचे अर्धशतक


छत्रपती संभाजीनगर7 तासांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

मसिआतर्फे आयोजित अद्यौगिक टी-20 क्रिकेट स्पर्धेत ग्रामीण पोलिस संघाने शानदार विजय मिळवला. गरवारे स्टेडियमवर मंगळवारी झालेल्या लढतीत ग्रामीण पोलिसांनी फिनिक्स एमआर इलेव्हन संघावर 6 गडी राखून मात केली. या लढतीत विशाल नरवडे सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

Advertisement

नाणेफेक जिंकून पोलिसांनी क्षेरक्षणाचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना फिनिक्सने 20 षटकांत 4 बाद 176 धावा उभारल्या. प्रत्युत्तरात ग्रामीण पोलिसांनी 19.2 षटकांत 4 गडी गमावत 179 धावा करत विजय मिळवला. यात सलामीवीर जोडीने संघाला चांगली सुरूवात करुन दिली. विकास नगरकरने अर्धशतक ठोकले. विकासने तुफान फटकेबाजी करत 15 चेंडूंचा सामना करताना 9 सणसणीत चौकार व 2 षटकार खेचत 50 धावांची खेळी केली. अष्टपैलू विशाल नरवडेने 24 चेंडूंत 4 चौकारांसह 31 धावा काढल्या. विशाल व विकास जोडीने पहिल्या गड्यासाठी 75 धावांची भागीदारी केली. शुभम हरकळ 5 व इशांत राय 11 धावांवर परतले. अविनाश मुकेने 40 चेंडूंत 4 चौकारांसह 45 धावा काढल्या. कर्णधार संदीप जाधवने 22 चेंडूंत 3 चौकार लगावत नाबाद 32 धावांची विजयी खेळी केली. फिनिक्सकडून मो. उमर अब्बास, शोएब शेख, आकाश जमधडेने प्रत्येकी एकाला टिपले.

कय्युमचे शतक हुकले

Advertisement

तत्पूर्वी, फिनिक्सकडून मो. उमर अब्बासने 35 चेंडूंत 33 धावा काढल्या. त्यानंतर कय्युमने 35 चेंडूंत 14 चौकार खेचत नाबाद 98 धावांची खेळी केली. समिर शेखने 25 धावा जोडल्या. पोलिसांकडून संजय सपकाळ व विशाल नरवडे यांनी प्रत्येकी दाेन दाेन गडी बाद केले.



Source link

Advertisement