मलिकांच्या ट्विटला लगाम: नवाब मलिक 9 डिसेंबर पर्यंत वानखेडे कुटुंबियांच्या विरोधात कोणतीही सोशल मीडिया पोस्ट करणार नाहीत; मलिकांच्या वकिलांनी हायकोर्टाला दिली माहिती


  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Nawab Malik Vs Dyandev Wankhede | Marathi News | Nawab Malik Will Not Post Anything On Wankhede Family Informs Malik Advocate In High Court

Advertisement

मुंबई26 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आणि महाराष्ट्रातील मंत्री नवाब मलिक आता 9 डिसेंबर पर्यंत वानखेडे कुटुंबियांवर कुठलीही सोशल मीडिया पोस्ट करणार नाहीत. NCB चे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या कुटुंबीयांबद्दल ट्विट किंवा विधाने करू नयेत असे हायकोर्टाने म्हटले आहे. यानंतरच नवाब मलिकांच्या वकिलांनी हायकोर्टात शपथपत्र दाखल करून 9 डिसेंबर पर्यंत मलिक या आशयाची सोशल मीडिया पोस्ट करणार नाहीत असे सांगितले आहे.

Advertisement

पुढील सुनावणी पर्यंत पोस्ट करणार नाहीत मलिक

नवाब मलिक यांच्या वकिलांनी कोर्टात दिलेल्या माहितीनुसार, पुढील सुनावणीपर्यंत नवाब मलिक ज्ञानदेव वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांविरुद्ध कोणतेही ट्विट किंवा सार्वजनिक वक्तव्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष माध्यमातून करणार नाहीत. कोर्टाने सुनावल्यानंतर वकिलांनी तसे लिहून दिले आहे.

Advertisement

सव्वा कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा

एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे आणि त्यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांच्या जात प्रमाणपत्रावर नवाब मलिक यांनी आरोपांची मालिकाच सुरू केली आहे. त्या विरोधातच ज्ञानदेव वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात नवाब मलिक यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल केला आहे. मलिकांच्या रोजच्या नव-नवीन विधानांमुळे वानखेडे कुटुंबियांची प्रतीमा मलीन होत असल्याचे ज्ञानदेव वानखेडे यांनी म्हटले आहे. तसेच कोर्टाने मलिक यांच्या बोलण्यावर (वानखेडे कुटुंबियांबद्दल) बंदी घालावी असे आवाहनही केले. ज्ञानदेव यांनी नवाब मलिक यांच्याविरिुद्ध सव्वा कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला.

Advertisement

सकाळीच केला नवा आरोप

तत्पूर्वी, गुरुवारी सकाळीच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते मलिक यांनी समीर वानखेडेंबाबत नवीन खुलासा केला. मलिकांनी आज समीर वानखेडेंची आई झाहिदा यांचे मृत्यू प्रमाणपत्र शेअर केले. या प्रमाणपत्राद्वारे नवाब मलिक यांनी दावा केला की झाहिदा यांचा दफनविधी मुस्लिम कब्रस्तानात झाला. त्यानंतर वानखेडे कुटुंबियांनी लाभ घेण्यासाठी त्यांचे मृत्यू प्रमाणपत्र हिंदू नावाने करून घेतले.

Advertisement

बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here