मराठी पाऊल पुन्हा एकदा पुडे टाकत आता आयपीएल समालोचन मराठीत, रवी शास्त्री-संदीप पाटील करणार समालोचन

मराठी पाऊल पुन्हा एकदा पुडे टाकत आता आयपीएल समालोचन मराठीत, रवी शास्त्री-संदीप पाटील करणार समालोचन
मराठी पाऊल पुन्हा एकदा पुडे टाकत आता आयपीएल समालोचन मराठीत, रवी शास्त्री-संदीप पाटील करणार समालोचन

आयपीएल हे जगभरात आवडीने पाहिले जाते, पण त्यामध्येही त्यांनी आपला मराठी बाणा कायम जपला आहे. कारण ‘स्टार स्पोर्ट्स’तर्फे ‘टाटा आयपीएल २०२२’चे सर्व सामने मराठी भाषेत सादर करण्यात येणार आहेत. ज्यांना आयपीएल मराठीत बघायचे आहे, त्यांना मराठीत पाहण्याचा पर्याय उपलब्ध असेल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे संदीप पाटील, विनोद कांबळी व अमोल मुजुमदार हे तीन परिचित क्रिकेटपटू मराठी समालोचनाच्या पथकाचा भाग असतील. हिंदी समालोचन पथकात असलेले रवी शास्त्री आणि किरण मोरे हेही मराठीमध्ये कॉमेंट्री करणार आहेत.

डिस्ने स्टारचे क्रीडा विभागाचे प्रमुख संजोग गुप्ता यांनी यावेळी सांगितले की, “मराठी दर्शकांची मोठी संख्या लक्षात घेऊन, आम्ही प्रथमच आयपीएलचे सर्व सामने मराठीत प्रसारीत करीत आहोत. आयपीएलची सर्वाधिक दर्शकसंख्या महाराष्ट्रात आहे. आयपीएलला महाराष्ट्रापेक्षा जास्त दर्शकसंख्या इतर कोणत्याही राज्यात नाही. मोठा चाहता वर्ग आणि वाढती दर्शकसंख्या लक्षात घेऊन, आयपीएलच्या इतिहासात प्रथमच सर्व ७४ सामन्यांमध्ये मराठी भाषेत आयपीएलचे प्रसारण केले जाणार आहे.”

Advertisement

आयपीएलमध्ये आता मराठी बाणा पाहायला मिळू शकतो. कारण यावर्षी आयपीएलमध्ये आता तुम्हाला मराठीमध्ये धावते समालोचन ऐकायला मिळणार आहे. भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्रीही यावेळी मराठीमध्ये समालोचन करणार आहेत. त्याचबरोबर संदीप पाटील, अमोल मुझुमदार, विनोद कांबळी, किरण मोरे हेदेखील मराठी समालोचन करताना पाहायलला मिळतील. त्यामुळे यावर्षी आयपीएल तुम्ही मराठीतही पाहू शकता.

आता क्रिको करणार समालोचकांना मदत

Advertisement

समालोचन करत असताना लगेचच काही माहिती गरज लागत असते. पण बऱ्याचदा लगेच ही माहिती काहीवेळाला मिळत नाही. त्यासाठी आता एक नवीन उपक्रम राबवण्यात आला आहे. याबाबत गुप्ता यांनी सांगितले की, “ माहिती त्वरीत उपलब्ध असण्याची गरज लक्षात घेऊनच आम्ही ‘क्रिको’ (रोबो स्टॅटिस्टिक्स) ही एक मनोरंजक संकल्पना विकसित केली आहे. समालोचकांसाठी सहाय्यक म्हणूनही ‘क्रिको’ काम करेल. उदाहरणार्थ, ‘आयपीएल’मध्ये विराट कोहली किती वेळा ‘इनकमिंग’ चेंडूंवर बाद झाला हे आमच्या समालोचकांना जाणून घ्यायचे असेल, किंवा जसप्रीत बुमराहने केलेल्या धीम्या चेंडूंची टक्केवारी हवी असेल, तर ते ‘क्रिको’ला (रोबो) विचारू शकतात. त्यातून त्यांना ३० सेकंदांमध्ये उत्तरे मिळतील. आमच्या समालोचकांना खेळ प्रत्यक्ष सुरू असताना लागणारी सर्व प्रकारची

माहिती सज्ज ठेवणे, तसेच इंटरनेट किंवा इतर कोणत्याही प्लॅटफॉर्मवर ती शोधत बसण्यापेक्षा त्वरित उपलब्ध करून देणे, असी ही नावीन्यपूर्ण कल्पना आहे.”

Advertisement