अमरावती2 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
मराठा आराक्षणाच्या मागणीसाठी जालना येथे शांततेत आंदोलन करणाऱ्या मराठा समाजातील आंदोलकांवर पोलिसांनी अमानुषपणे लाठीहल्ला केल्यामुळे सत्ताधाऱ्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, या मागणीसाठी आज, 5 सप्टेंबर रोजी अचलपूर तहसील कार्यालयावर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे व मराठा सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमाने मोर्चा काढण्यात आला. आंदोलनाच्या शेवटी अचलपूर तहसीलदार यांना निवेदन देऊन मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्यांवर लाठीहल्ला व मारहाण करत खोटया केसेस लावल्याचा निषेध करण्यात आला.
या पदाधिकाऱ्यांची होती उपस्थिती
यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख नरेंद्र पडोळे, तालुका प्रमुख बंडू घोम, चांदुरबाजारचे तालुका प्रमुख आशिष वाटाणे, सागर वाटाणे, शैलेश पांडे, मनोहर कोथलकर, सुरेश भाकरे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष दिनेश ठाकरे, मुन्ना शर्मा, माजी नगरसेवक नरेंद्र फिस्के, विलास सोळंके, सुरेश काकडे, छोटु ठाकरे, पंकज विधळे, पवन फाटे, टिल्लु शर्मा, गजु फिस्के, नरेंद्र भाकरे, अक्षय पावडे, गजानन घोगे, आशिष सहारे, शंकर वाटाणे, विनोद काळे, सुनिल सगणे, श्याम शेंडे, विशाल काळे, राहूल वखरे, राहुल मुंदाने, दीपक भडके, विनोद गावंडे, मोहन मुंदाने, निलेश काळे, विजय खेचे ऋषिकेश सगणे आदि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.