मराठा समाजाला तातडीने आरक्षण द्या!: पैठण मराठा क्रांती मार्चाच्या वतीने लाँग मार्च; ‘एक मराठा-लाख मराठा’ घोषणांनी भडकल गेट परिसर दणाणले

मराठा समाजाला तातडीने आरक्षण द्या!: पैठण मराठा क्रांती मार्चाच्या वतीने लाँग मार्च; ‘एक मराठा-लाख मराठा’ घोषणांनी भडकल गेट परिसर दणाणले


औरंगाबाद7 तासांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

मराठा आरक्षणासह विविध मागण्यांकडे मंत्रीमंडळाचे लक्ष वेधण्यासाठी पैठण मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने शुक्रवारी पैठण येथून लाँंग मार्च काढण्यात आला होता. तो सकाळी ११.३० वाजता शहरातील भडकल गेट येथे पोहोचेला. येथे निदर्शने व आक्रोश आंदोलन केले. त्यानंतर पाच महिला व विद्यार्थ्यांनींनी निवेदन कक्षात मागण्यांचे निवेदन सादर केले. तसेच मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन त्यांनाही निवेदन देऊन मराठा आरक्षणाचा प्रश्न तातडीने मार्गी लावा यासह विविध मागण्यांचे निवेदन दिले.

Advertisement

निवेदनात म्हटले आहे की, ज्यांच्याकडे कुणबीची नोंदच सापडत नाहीत, असा गोरगरीब मराठा समाज मोठ्या संख्येने आहे. त्यांना आरक्षणाची नितांत गरज आहे. हि बाब सरकारने आवर्जुन समजून घ्यावे व सरसकट मराठा समाजाला ओबीसीतून तातडीने आरक्षण द्यावे. अण्णासाहेब आर्थिक मागास आर्थिक विकास महामंडळ वैयक्तिक कर्ज योजनेतून बँका कर्जच देत नाहीत. जागोजागी त्रूटी कढून प्रस्ताव ना मंजुर केला जातो. अडवणूक करून लांबणीवर टाकले जातात. त्यामुळे बेरोजागारांची कुचंबणा होत आहे.

ही समस्या सरकारने त्वरीत सोडवावी. महामंडळाने ५ लाख रूपयापर्यंतचे कर्ज स्वत द्यावे, यासाठी सरकारने महामंडळाला निधी उपलब्ध करून द्यावा. कोपर्डीतील नराधमांना लवकरात लवकर फाशी द्यावी, ओबीसी आरक्षणाचे फेरसर्वेक्षण करावे, फुगीर आरक्षण कमी करावे, आरक्षण रद्द झाल्याने निवड झालेल्या सर्व उमेदवारांना नोकरीत सामावून घ्यावे, सारथीच्या कल्याणकारी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी या प्रमुख मागण्यासांठी पैठण मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत चर्चा केली व मागण्यांचे निवेदन सादर केले.

Advertisement

या बाबी दिसल्या लक्षवेधी

लाँग मार्च, सर्वांच्या डोक्यावर भगवी टोपी, त्यावर एक मराठा लाख मराठा लिहिलेले आहे. महिलांचाही उत्स्फूर्तपणे सहभाग होते. शिवध्वज आणि गगनभेदी घोषणा लक्षवेधी ठरल्या.

Advertisement



Source link

Advertisement