सांगलीएका तासापूर्वी
- कॉपी लिंक
मराठा, धनगर आरक्षणाप्रश्नी सत्ताधाऱ्यांनी फसवणूक केल्याची भावना निर्माण झालेली आहे, त्यामुळे केंद्र सरकारच्या अखत्यारीत असणारा आरक्षणाचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा. सरकारने केवळ फसवी आश्वासन जाहीर करू नये, अशी टीका काँग्रेसचे माजी मंत्री आमदार विश्वजित कदम यांनी केली आहे.
दरम्यान विश्वजित कदम पुढे बोलताना म्हणाले की, मराठा आणि धनगर समाजाला न्याय देण्याची भूमिका काँग्रेसची कायम आहे.काँग्रेस हे मराठा आणि धनगर समाजाच्या पाठीशी ठाम असल्याचा विश्वास देखील यावेळी त्यांनी व्यक्त केला आहे. सांगलीत बोलत असताना विश्वजित कदम यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
विश्वजित कदम काय म्हणाले?
विश्वजित कदम म्हणाले की, मुळात मराठा असो धनगर समाजातील आमचे बांधव असो यांच्यावर सातत्यांने अन्याय होत आहे. सत्ताधारी पक्षाने समाजाची फसवणूक केल्याची भावना असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले आहे. यावर राज्य सरकारने तातडीने मार्ग काढण्याची गरज आहे. केवळ फसवी आश्वासने देऊन चालणार नाही, असे मत कदम यांनी व्यक्त केले आहे.
जालन्यात 12 दिवसांपासून उपोषण
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्यासह मराठा समाजाने आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाचा आज बारावा दिवस असून अद्याप राज्य शासन आणि उपोषणर्ते यांच्यात तोडगा निघालेला नाही. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत राज्य सरकारने निर्णय घेतला असला, तरी सरसकट सर्व मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, या आपल्या मागणीवर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. त्यामुळे अद्याप मराठा आरक्षणाचा तिढा सुटलेला नाही.