कन्नड29 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
आंतरवाली (सराटी) येथे मनोज जरांगे पाटील यांचे गेल्या 15 दिवसापासून सुरू असलेल्या बेमुदत अन्नत्याग उपोषणाला पाठिंबा म्हणून आणि राज्य सरकार मराठा समाजाची कुठलीही मागणी गार्भियाने घेत नसल्याने शासनाच्या निषेधार्थ, आणि सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावे. या मागणीसाठी सकल मराठा समाज आग्रही झाल्याचे दिसत आहे.
या मागणीसाठी तालुक्यातील औराळा फाटा येथे जेहुर, औराळा, औराळी, निपानी, सहानगाव, खामगाव, रोहिला, कानडगाव, विटा, जवळी, पळसखेडा, हसनखेडा, कविटखेडा, गव्हाली, शेरोडी, चिंचखेडा खु. बिबखेडा, चिंचखेडा बु, हिंगणा (क) तांदुळवाडी, आडगाव, मुगंसापुर, चिवळी, केसापुर, अंतापुर, लव्हाळी या गावातील शेकडो सकल मराठा बांधवाच्या वतीने तब्बल दोन तास असा रास्तारोको आंदोलन आले.
नायब तहसीलदार साहेबराव घोडके, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे, मंडळ अधिकारी आबा पाटील, मंडळ अधिकारी सचिन भिंगारे, तलाठी आर.ए.गोरे, तलाठी एस.बी. जठार, तलाठी नामदेव कसुनुरे यांच्याकडे मागणीचे निवेदन देण्यात आले. सुरुवातीला सात शिवकन्याच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन रास्तारोको आंदोलनाला सुरुवात करण्यात आली.
यावेळी सुष्टी निकम, आकाक्षा जिवरख, साक्षी भिंगारे, दिपाली फाळके, अनुष्का निकम, प्रगती जिवरख, तेजस्विनी व्होलप या सात शिवकन्यानी आपले मनोगत व्यक्त केले.औराळा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर गेल्या चार दिवसापासून करत असलेल्या अन्नत्याग उपोषण आता सोडवावे, आपण साखळी पध्दतीने उपोषण करुन जरांगे पाटलाच्या उपोषणाला पाठिंबा देऊ असा विश्वास औराळा – जेहुर सर्कलच्या सकल मराठा समाजाने दिल्यानंतर आंदोलनस्थळी शेकडो समाज बांधवासमक्ष सतिष जिवरख, दिपक जिवरख, गणेश जगताप, योगेश जिवरख, गोकुळ जिवरख, राहुल शिंदे या आंदोलनकर्त्यांनी सात शिवकन्याच्या हस्ते लिंबुपाणी घेऊन उपोषण सोडले.
खामगावच्या तरुणांनी सोडले उपोषण
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर गेल्या सहा दिवसापासून रमेश गायके, अप्पासाहेब गायके, कुशिनाथ गायके, उमेश गायके, ज्ञानेश्वर गायके, बळीराम गायके करत असलेले अन्नत्याग उपोषण देखील गावातील जेष्ठ नागरिकांच्या हस्ते लिंबुपाणी घेऊन सोडविण्यात आले.
विविध घोषणांनी परिसर दणाणला
रास्तारोको आंदोलनात सहभागी झालेल्या शेकडो सकल मराठा बांधवांनी “एक मराठा लाख मराठा, तुमच आमच नात काय जय जिजाऊ जय शिवराय, कोण म्हणय देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही, आरक्षण आमच्या हक्काच नाही कोणाच्या बापाच, मनोज जरांगे पाटील तुम आगे बडो हम तुमारे साथ है, अशा अनेक जोरदार घोषणाबाजीने दणाणून सोडला.
मोठा पोलिस बंदोबस्त तैनात
मराठा समाजाचा आरक्षणाविषयीचा आक्रोश बघता आंदोलन कुठल्या तरी वेगळ्या वळणावर जाऊ शकते. ते होऊ नये आणि काही अनुचित प्रकार घडु नये यांची खबरदारी म्हणुन गंगापूर उपविभागीय पोलिस अधिकारी प्रकाश बेले, देवगाव रंगारी ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली देवगाव रंगारी पोलिसांसह दंगाकाबू पथकाचा मोठा फौजफाटा औराळा फाटा येथे सकाळी आठ वाजेपासुन तैनात करण्यात आला होता,