मराठा आरक्षणावरील भूमिका जाहीर करा, नाहीतर राजीनामा द्या: मराठा तरूणांचे बागडे यांच्या संपर्क कार्यालयासमोर उपोषण

मराठा आरक्षणावरील भूमिका जाहीर करा, नाहीतर राजीनामा द्या: मराठा तरूणांचे बागडे यांच्या संपर्क कार्यालयासमोर उपोषण


औरंगाबादएका तासापूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

फुलंब्री मतदार संघाचे आमदार हरिभाऊ बागडे यांनी मराठा आरक्षणावरील भूमिका त्वरीत जाहीर करावी. नाहीतर राजीनामा द्यावा, या प्रमुख मागणीसाठी मराठा तरूणांनी सोमवारी सिडको कॅनॉट प्लेस येथील संपर्क कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरु केले आहे. तत्पूर्वी सरकार विरोधात जोरदार निदर्शने आंदोलन करण्यात आले.

Advertisement

महाराष्ट्रातील गोरगरीब मराठा समाजाला सरसकट ओबीसीमध्ये समावेश करून कुणबी प्रमाणपत्र द्यावे. शैक्षणिक सेवासवलती लागू कराव्यात आणि नोकरीत सामवून घ्यावे. आंतरवाली सराटी येथे मराठा बांधवांवर झालेल्या लाठीहल्ला, गोळीबार, आश्रूधुरांचा अमानुषपणे मारा करणाऱ्या पोलिस अधिकारी, पोलिसांवर आणि त्यांना आदेश देणाऱ्यांना बडतर्फ करावे. मराठा तरूणांवर ३०७ सारखे गंभीर गुन्हे दाखल केले आहे. ते त्वरीत मागे घ्यावे, जखमी मराठा तरूणांचा सर्व उपाचार खर्च सरकारने उचलावा. तसेच आमदार हरिभाऊ बागडे यांनी त्यांची मराठा आरक्षणाची भूमिका जाहीर करावी, अन्यथा त्वरीत राजीनामा द्यावा, या प्रमुख मागण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या नेतृत्वात सोमवारी आमरण उपोषण सुरु करण्यात आले आहे.

जोरदार निदर्शने

Advertisement

आंदोलकांनी मराठा आमदार, खासदार आणि सरकार विरोधात जोरदार निदर्शने दिले. एक मराठा लाख मराठा, गृहमंत्री फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, सरकारने मराठा आरक्षणाचा प्रश्न त्वरीत मार्गी लावावा, यासाठी आग्रही मागणी केली. मोठ्या संख्येने मराठा तरूण, महिला आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.

पिसादेवी येथे आत्मदहन आंदोलन

Advertisement

पिसादेवी येथे भरत कदम, अमीत जाधव आणि पंढरीनाथ गोडसे पाटील यांनी गत पाच दिवसांपासून अमरण उपोषण आंदोलन सुरु केले आहे. आत्मदहनाचाही त्यांनी प्रयत्न केला. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांचे फोटो ठेवून प्रतित्मक पुतळ्याची होळी करून निषेध नोंदवला. मराठा आरक्षणाचा प्रश्न मंत्रीमंडळाच्या बैठकी अगोदर मार्गी लावाला, अन्यथा समाजाचा उद्रेक झाला तर त्यास सरकार जबाबदार राहील, असा निर्वाणीचा इशारा दिला आहे.



Source link

Advertisement