मराठा आरक्षणाची धग कायम: मराठा आरक्षणासाठी गाव पातळीवर आंदोलन, आज ठाणे बंदची हाक; CM शिंदे पुणे दौऱ्यावर

मराठा आरक्षणाची धग कायम: मराठा आरक्षणासाठी गाव पातळीवर आंदोलन, आज ठाणे बंदची हाक; CM शिंदे पुणे दौऱ्यावर


मुंबई8 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा आज 14 दिवस आहे. जालन्याच्या आंतरवाली सराटीत मनोज पाटील यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन आता अनेक गावांत पोहोचले असून, यामुळे सरकारपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. यासह महाराष्ट्रातील इतर घडामोडी वाचा फक्त एका क्लिकवर

Advertisement

Live Update’s

  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले आहे.
  • सकल मराठा समाजाने सोमवारी ठाणे बंदची हाक दिली आहे. यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे स्थित निवासस्थानाबाहेरील सुरक्षा व्यवस्थेत मोठी वाढ करण्यात आली आहे. या बंदला संभाजी ब्रिगेडनेही पाठिंबा दिला आहे.
  • साताऱ्याच्या पुसेसावळी गावात 2 गटांत दगडफके झाली आहे. सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टवरुन हा वाद झाल्याची माहिती आहे. या ठिकाणी मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
  • 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या ज्योतिर्लिंग भीमाशंकर येथे आज शेवटच्या श्रावणी सोमवार निमित्त लाखो भाविकांची गर्दी झाली आहे. देशभरातून आलेल्या भक्तांची पहाटेपासूनच दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत.
  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुणे दौऱ्यावर आहेत. श्नावणी सोमवारच्या निमित्ताने ते आज सहकुटुंब भीमाशंकरला जाऊन दर्शन घेणार आहेत. त्यांचे हेलिकॉप्टरने पुण्यात आगमन होईल.
  • मनसे नेते अमित ठाकरे पुणे दौऱ्यावर जाणार आहे. ते लोकसभा निवडणुकीसंबंधी तेथील कार्यकर्त्यांसोबत बैठका घेणार आहेत. पक्ष बांधणी, उमेदवार निवड, प्रचार आदी विविध मुद्यांवर ते त्यांच्याशी चर्चा करतील. मनसेने पुणे लोकसभेच्या निवडणुकीची जबाबदारी अमित ठाकरे यांच्या खांद्यावर सोपवली आहे.
  • पुणे शहरात आनंदाचा शिधा वाटपास सुरुवात. आतापर्यंत एकूण 94 हजार लाभार्थ्यांना लाभ मिळाल्याची माहिती. गणेशोत्सवासह दिवाळीनिमित्त पुणे शहरातील 3 लाख 20 हजार लाभार्थ्यांना हा शिधा दिला जाणार आहे. 19 सप्टेंबर पर्यंत 100% शिधा वाटपाचे उद्दीष्ट पूर्ण करण्याचे उद्दीष्ट आहे. या अंतर्गत लाभार्थ्यांना रवा, पाम तेल, साखर, हरभऱ्याची डाळ या 4 गोष्टी दिल्या जाणार आहेत.
  • गणेशोत्सवात कोकणात मोठ्या संख्येने चाकरमानी दाखल होतात. त्यामुळे महामार्गावर होणारी वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या गृह (परिवहन) विभागाकडून अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी नियमावली जाहीर करण्यात आली आहे.
  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी 12 सप्टेंबर रोजी जळगाव दौऱ्यावर



Source link

Advertisement