मराठा आंदोलनाचा आज 10 दिवस: सांगली, बीड जिल्ह्यात आज बंदची हाक; ठिकठिकाणी निदर्शने, रास्ता रोको आंदोलन

मराठा आंदोलनाचा आज 10 दिवस: सांगली, बीड जिल्ह्यात आज बंदची हाक; ठिकठिकाणी निदर्शने, रास्ता रोको आंदोलन


जालनाएका तासापूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील आंतरवाडी सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्त्वात आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनाचा आज 10 वा दिवस आहे. काल या संदर्भात शासनाने तोडगा काढण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, आंदोलन संपवण्याबाबत मनोज जरांगे यांनी अद्याप घोषणा केलेली नाही. आज सकाळी 11 वाजता सहकार्यांशी चर्चा करुन या बाबत निर्णय घेणार असल्याचे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. आता त्यांच्या निर्णयाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Advertisement

बीड बंद : जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा देत बीड जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज गुरुवार 7 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेत शहरात चार तर जिल्ह्यातील 17 ठिकाणी चक्का जाम आंदोलन केले जाणार आहे.

चक्का जाम आंदोलनाची आचारसंहिता

Advertisement
  • सकाळी 10 ते 12 या वेळेत चक्का जाम आंदोलन होणार असून आंदोलनापूर्वी प्रमुख मराठा बांधवांनी आंदोलनाचे ठिकाण निवडून त्याची माहिती आपल्या विभागातील पोलिस प्रशासनास द्यावी.
  • प्रमुख मराठा कार्यकर्त्यांनी हे आंदोलन लोकशाही पद्धतीने व शांततेच्या मार्गाने करावे, आंदोलनाच्या वेळी कायदा व सुव्यवस्था राखावी.
  • चक्का जाम आंदोलनाच्या वेळी रुग्णवाहिका, अग्निशामक दल, पोलिस प्रशासनाच्या गाड्यासाठी मार्ग मोकळा करून द्यावा.

सांगली बंद : सांगलीत आज भव्य मोर्चासह सांगली जिल्हा बंदचे आवाहन मराठा सेवा संघाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच विविध गांवामध्येही निदर्शने करण्यात येणार आहे. याचा परिणाम एसटी महामंडळाच्या वाहतूकीवर देखील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.Source link

Advertisement