मराठवाड्यात गद्दार गाडले जातील: हिंगोलीत कावड यात्रा श्रद्धेसाठी नाही तर स्वत:ची मार्केटिंग काढणारे; अंबादास दानवेंची बांगरावर टीका

मराठवाड्यात गद्दार गाडले जातील: हिंगोलीत कावड यात्रा श्रद्धेसाठी नाही तर स्वत:ची मार्केटिंग काढणारे; अंबादास दानवेंची बांगरावर टीका


हिंगोली32 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

मराठवाडा ही संताची भूमी आहे, या मराठवाड्याने गद्दारांना कधीही साथ दिली नाही, हा इतिहास आहे. मराठवाड्यात गद्दार गाडले जातील, असा इशारा ठाकरे गटाचे नेते, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिला आहे.

Advertisement

दरम्यान अंबादास दानवे पुढे बोलताना म्हणाले की, ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना सभेसाठी येण्यासाठी गाड्या लावाव्या लागत नाही. काही जण हिंगोलीत कावड यात्रा श्रद्धेसाठी नाही तर स्वत:ची मार्केटिंग व्हावी म्हणून काढणारे आमदार आहेत, असे म्हणत संतोष बांगर यांच्यावर अंबादास दानवे यांनी टीकास्त्र डागले आहे. हिंगोली जिल्ह्यातील दोन नंबरचे धंदे करा म्हणत युवकांना तयार करणाऱ्या नेत्याच्या तावडीत हा जिल्हा अडकला आहे असे म्हणत अंबादास दानवे यांनी जोरदार टीकास्त्र डागले आहे.

धनंजय मुंडेंवर टीका

Advertisement

अंबादास दानवे म्हणाले की, कृषीमंत्र्यांनी मराठवाड्यात आठ दिवसात बैठक घेऊ सांगितले होते, अद्याप त्यांनी बैठक घेतली आहे, अशी टीका दानवे यांनी धनंजय मुंडे यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विकास करीत नाही, पण विरोध करतात. ते मुख्यमंत्री असताना त्यांनी शेतकऱ्यांना पुरेशी कर्जमाफी केली नाही, पण उद्धव ठाकरे यांनी 99 टक्के कर्जमाफी शेतकऱ्यांसाठी केली

उद्धव ठाकरेंची बांगरांवर टीका

Advertisement

उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी हिंगोलीतील जाहीर सभेतून आमदार संतोष बांगर यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. ज्या गद्दाराला आपण नाक समजून पूजा केली, उलट तोच आपल्यालाच डसायला लागला. तुला पुंगी वाजवली तुला दूध पाजले. मटक्याचे अड्डे चालवणाऱ्या हिंदुत्ववादी मानायचे का, उद्धटपणा येथे चालणार नाही, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी बांगर यांचा समाचार घेला.

दरम्यान उद्धव ठाकरे म्हणाले की, श्रावण महिना सुरू झाला आहे. नागपंचमी झाली. गद्दारांना साप समजून पूजायाला लागलो. पायाखाली साप आला तर शेतकऱ्यांना काय करायचे हे माहीत आहे. अवैध धंदे करणारा हिंदू असेल का, असू शकतो? हिंगोलीचे गद्दार उद्धटपणा करतात, त्यांना गाडून टाका, अशी टीका उद्धव ठाकरे हिंगोलीच्या सभेतून केली आहे.

Advertisement



Source link

Advertisement