मराठवाडा हीच मराठी भाषेची जननी: विद्यापीठाच्या मराठी विभागातील ‘जागर मराठी’ कार्यक्रमात प्राचार्य कौतिककराव ठालेंनी व्यक्त केले मत


  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • Marathwada Is The Birthplace Of Marathi Language; Principal Kautikkarao Thale Expressed His Opinion In The ‘Jagar Marathi’ Program Of The Marathi Department Of The University

औरंगाबाद2 तासांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

मराठी भाषेचा जन्म हा अजिंठ्याच्या डोंगररांगा व गोदावरी खोऱ्यातील भूभागात म्हणजेच मराठवाड्यात झालेला आहे. आजच्या प्रमाण मराठी भाषेत असलेली रूपंही मराठवाड्याच्या मराठी भाषेतील आद्यरूपं आहेत, असे मत मराठवाडा साहित्य परिषदेचे (मसाप) अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले यांनी व्यक्त केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी विभाग व महाराष्ट्र राज्याच्या भाषा संचालनालयाच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवड्या निमित्त ‘जागर मराठीचा’ कार्यक्रमात बोलत होते.

Advertisement

विभागप्रमुख प्रा. दासू वैद्य, भाषा संचालनालयाचे अनुवादक बाबासाहेब जगताप, कवी हबीब भंडारे, समन्वयक डॉ. कैलास अंभुरे यांची मंचावर उपस्थिती होती. ‘औरंगाबाद जिल्ह्याची साहित्य व सांस्कृतिक परंपरा’ या विषयावर त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ‘मराठी भाषा ही अभिजात आहेच. तिला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा हे आर्थिक, भाषा व वाङम समृद्धीच्या दृष्टीने योग्य आहे. शालिवाहन काळापासून पैठण हे सर्व सांस्कृतिक घडामोडींचे केंद्र होते. तद्वतच बौद्ध धर्माच्या चार केंद्रापैकी अजिंठा हे एक केंद्र होते. मराठी संस्कृती इथे घडली या प्रदेशानेच महाराष्ट्राचे सांस्कृतिक नेतृत्व केले. यादवांच्या काळात पहिल्यांदा मराठी ही राजभाषा झाली. परंतु हेमाद्री पंडिताने ‘चतुर्वर्ग चिंतामणी’ या ग्रंथाद्वारे कर्मकांडाचे स्तोम वाढवले.

त्याचा परिणाम नंतरच्या काळातील वाङमयीन व सांस्कृतिक नेतृत्वावर झाला. लोकसाहित्याचा जन्मही मराठवाड्यातच झाला. परंतु निजामी राजवटीच्या काळात भाषिक सांस्कृतिक गळचेपीमुळे मराठवाड्यात साहित्य निर्मिती झाली नाही. संस्कृती बरोबरच साहित्याची आद्यभूमी ही मराठवाडा आहे. अगदी वारकरी संप्रदायात निर्माण झालेली उदात्त सांस्कृतिक परंपरा मराठवाड्यातील बहुजन संतांपासून आलेली आहे. संत बहिणाबाई, निळोबाराय, शाहीर विश्राम पाटील यांच्यावर संशोधनाची आवश्यकता आहे.’ असेही त्यांनी म्हटले.

Advertisement

पोलिस निरीक्षक प्रशांत पोतदारांचे आज अनुभव कथन

प्रास्ताविक विभागप्रमुख प्रा. दासू वैद्य यांनी केले. अनुवादक बाबासाहेब जगताप यांनी भाषा संचालनालयाचे कार्य व भूमिका विषद केली. स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङमय पुरस्काराबद्दल कवी हबीब भंडारे यांचा विभागाच्या वतीने सत्कार करण्यात आला. डॉ. विलास गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. अंभुरे यांनी आभार मानले. पोलिस निरीक्षक प्रशांत पोतदार सकाळी 11 वाजता माझा वाचन प्रवास याविषयावर अनुभव कथन करणार आहेत.

Advertisement

बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement