औरंगाबाद10 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
महाराष्ट्र विधान परिषदेच्या औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आजपर्यंत एकूण 15 उमेदवारांचे 30 नामनिर्देशन अर्ज दाखल झाले आहेत, अशी माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त जगदिश मिनीयार यांनी दिली आहे.
भाजपतर्फे किरण पाटील यांचा अर्ज
उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपच्या किरण पाटील यांनी अर्ज भरला. तर बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विक्रम काळे यांनी अर्ज भरला होता. तर वंचित बहुजन आघाडी कडून कालिदास माने तर शिक्षक मुख्याध्यापक आणि संस्थाचालक समन्वय समिती यांच्या वतीने मनोज पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत
काल आज शक्तिप्रदर्शन
आजपर्यंत नामनिर्देशन अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, वंचित बहुजन आघाडी या राजकीय पक्षांचा समावेश आहे. तर उर्वरित उमेदवारांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखले केले आहेत. गेल्या दोन दिवसात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या वतीने शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते.
दानवे, बावनकुळे, वळसेंची उपस्थिती
राष्ट्रवादी काँग्रेस कडून विधान सभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार दिलीप वळसे पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते तर भाजपकडून प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांची उपस्थिती होती
उद्या होणार छाननी
आज 12 जानेवारी रोजी निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार नामनिर्देशन दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. उद्या 13 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता अर्जाची छाननी होणार आहे.तर अर्ज परत घेण्याची मुदत 16 जानेवारी आहे. त्यामुळे 16 जानेवारी नंतरच निवडणुकीच्या संदर्भात आणखीन चित्र स्पष्ट होईल