मनोज वाजपेयींचा ‘द फॅमिली मॅन’ तिसऱ्या सिझनमध्येही भेटणार!


‘द फॅमिली मॅन’(The Family Man)च्या पहिल्या सिझनच्या यशानंतर  ‘फॅमिली मॅन 2’ (Family Man 2) देखील  प्रेक्षकांच्या पसंतीस  उतरत आहे.  अभिनेता मनोज वाजपेयी, प्रियामणी, समंथा अक्खीनेनी या कलाकारांनी आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. आता या दोन्ही सिझनच्या जबरदस्त अनुभवानंतर द फॅमिली मॅनच्या तिसऱ्या सिझनसाठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. पहिल्या दोन सिझनच्या यशानंतर काही दिवसांपूर्वी तिसऱ्या भागाचेही संकेत मिळाले होते.  मात्र आत्ता स्वतः मनोज वाजपेयी यांनी द फॅमिली मॅन तिसऱ्या सिझन बद्दल माहिती दिली आहे. (Manoj Vajpayees The Family Man will also meet in the third season)

Advertisement

मनोज वाजपेयी यांनी  ‘बॉलिवूड बबल्स’या वेबसाइटला दिलेल्या एका मुलाखतीत तिसऱ्या सिझनची माहिती दिली आहे.  द फॅमिली मॅन  तिसऱ्या सिझनची कथा तयार असून लॉकडाऊननंतर वेबसिरीजच्या तिसऱ्या भागावर काम सुरू होणार आहे. अमेझॉनकडून ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर चित्रीकरणाला सुरुवात होईल आणि कोविडचा संसर्ग आणखी कमी झाला तर तिसऱ्या भागाचं शुटींग करण्यासाठी एक ते दीड वर्षे लागतील, असे मनोज वाजपेयी यांनी म्हटले आहे.

 राष्ट्रवादी कॉंग्रेसचा वर्धापन दिन लोकपयोगी कार्यक्रमांनी साजरा

Advertisement

देशाच्या गुप्तहेर विभागात काम करणाऱ्या श्रीकांत तिवारी या व्यक्तिरेखेमुळे अभिनेता मनोज वाजपेयी सध्या चांगलेच चर्चेत आहेत. ‘द फॅमिली मॅन’च्या पहिल्या सिझनमध्ये दिल्ली आणि जम्मू काश्मीर स्थितीवर भाष्य करण्यात आले आहे.  तर ‘फॅमिली मॅन 2’ मध्ये तमिळमधील नक्षलवाद्यांशी  लढा देताना दाखवण्यात आले आहे.  सिरिजमधील अनेक भागही सोशल मिडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत. मात्र दाक्षिणात्य सुपरस्टार समंथा अक्खीनेनीला सुसाईड बॉम्बर दाखविण्यात आल्यामुळे तिच्या अनेक चंहतींनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

Advertisement

आता तिसऱ्या सिझनमध्ये श्रीकांत तिवारी चीनकडून होणाऱ्या संकटांचा सामना करताना दिसणार आहे.  एकीकडे जीव धोक्यात घालणारी नोकरी आणि दुसरीकडे आपल्या कुटुंबांच्या गरजा पूर्ण करताना होणारी कसरत मनोज वाजपेयी यांनी उत्तमपणे निभावली आहे. विशेष म्हणजे गुप्तचर एजंट्सशी संबंधित सर्व गैरसमज हे या सिरिजमध्ये अधोरेखित करण्यात आले आहे.   ही मालिका त्या सर्वांना गैरसमजांना खंडित करते. विशेष म्हणजे खऱ्या आयुष्यात गुप्तहेर  कोणत्या परिस्थितीत कार्य करतात आणि देशाची सेवा करण्याचे साहस, हिंमत असे अनेक पैलू या सिरिजमध्ये दाखविण्यात आले आहे.

खरतर, आतापर्यंत जर देशावर कोणताही दहशतवादी हल्ला झाला नसता तर गुप्तचर विभागाचे कधीही कौतुक झाले नसते, या संघटना अशावेळी काय काम करतात याबद्दल कोणालाही माहिती पडले नसते. परंतु देशात एक दहशतवादी हल्ला झाला तर सर्वजण त्यांच्यावर टीका करायला लागतात. पण या सिरिजच्या माध्यमातून गुप्तहेर संघटनांच्या जीवघेण्या कामाची दखल घेण्यात आली आहे, असेही मनोज वाजपेयी यांनी म्हटले आहे.

AdvertisementSource link

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here