आंतरवली सराटीएका तासापूर्वी
- कॉपी लिंक
मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे मागील 15 दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. जालना येथील आंतरवली सटारी येथे सुरू असलेल्या त्यांच्या उपोषणाचा आज तब्बल 16वा दिवस आहे. दरम्यान, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, सर्व मंत्रिमंडळ, छत्रपती उदयनराजे भोसले व छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी आंतरवाली सराटीमध्ये येऊन मराठा आश्वासनाबाबत लेखी आश्वासन दिले तरच उपोषण मागे घेईल, अशी भूमिका मनोज जरांगे यांनी मंगळवारी स्पष्ट केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या सर्व मंत्रिमंडळासह आंतरवली सराटी येथे जाणार का? याकडे आता अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
आरक्षण मिळेपर्यंत साखळी उपोषण सुरूच
मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीवर ठाम असलेले मनोज जरांगे पाटील यांनी अखेर मंगळवारी सरकारला एका महिन्याची मुदत दिली. मात्र मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आंतरवालीत येऊन सर्वांसमोर सर्व मागण्या मान्य केल्याचे बाँडपेपरवर लिहून दिले तरच आपण बेमुदत उपोषण मागे घेऊ, अशी भूमिका जरांगे पाटील यांनी मांडली. तसेच, सरकारने नेमलेल्या न्या. संदीप शिंदे समितीचा अहवाल काहीही आला तरी 12 ऑक्टोबरपासून कुणबी प्रमाणपत्र वाटप झाले पाहिजे यासह 5 अटी त्यांनी ठेवल्या आहेत. सरकारने त्या मान्य केल्या तरी आरक्षण मिळेपर्यंत साखळी उपोषण सुरूच राहील, असेही जरांगे यांनी स्पष्ट केले.
12 ऑक्टोबरची डेडलाइन, 5 अटी
- न्या.संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीचा अहवाल काहीही येवो, मराठ्यांना 31 व्या दिवशी (12 ऑक्टोबर) महाराष्ट्रभरात कुणबी प्रमाणपत्र वाटप करावे.
- मराठा आरक्षणासाठी राज्यात सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान सर्व आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे तातडीने मागे घेण्यात यावेत.
- आंदोलकांसह ग्रामस्थांवर लाठीचार्ज करणाऱ्या सर्व दोषी पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित करावे.
- मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, सर्व मंत्रिमंडळ, छत्रपती उदयनराजे भोसले व छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी आंतरवाली सराटीमध्ये येऊन लेखी आश्वासन द्यावे.
- सरकारने मराठा समाजाच्या या सर्व अटी मान्य असल्याचे बाँडपेपरवर टाइप करून लेखी अाश्वासन द्यावे.
मुख्यमंत्री आज कळवणार
पाच अटी टाकून उपोषण मागे घेण्याची तयारी आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी दाखवताच त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय व उद्योगमंत्री मंगळवारी रात्री 8 वाजता आंतरवाली सराटी गावात दाखल झाले. त्यांनी जरांगे पाटील आणि मुख्यमंत्री यांचे फोनवरून बोलणे करून दिले. मात्र त्यांच्या अटी मान्य करण्याबाबत ठोस आश्वासन देण्यात आले नाही. उपोषण सोडवण्यासाठी आंतरवाली गावात येणार की नाही याबाबतचा निर्णय बुधवारी कळवतो, एवढेच आश्वासन मुख्यमंत्र्यांनी जरांगेंना दिल्याची माहिती आहे.
संबंधित वृत्त
मराठा आरक्षणाचा गुंता:जालन्याच्या आंतरवाली सराटीत नेमके काय सुरू? नांदेड – वसमत रोडवर अज्ञात व्यक्तींनी एसटी पेटवून दिली
नांदेड-वसमत रोडवर मंगळवारी रात्री एसटी बसवर 20 ते 25 अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला. त्यांनी प्रथम दगडफेक करून बस थांबवली. त्यानंतर बसमधील सर्व प्रवाशांना खाली उतरवून पेट्रोल टाकून बस पेटवून दिली. हे तरुण कोण? कुठून आले? याची कोणतीही माहिती नाही. वाचा सविस्तर