मुंबई25 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
मनसे हा त्यांच्या वाटेला जाण्याएवढा मोठा पक्ष नाही. त्यांच्या वाटेला कुणीच गेलेले नाही, तर हे सरकार केवळ ईडी, सीबीआय आणि खोक्याच्या साथीने पडले हे सर्वांना माहिती आहे, राज ठाकरेंना जर हे समजत नसेनल तर त्यांच्या पक्षाची व्यवस्थित वाढ होणे गरजेचे आहे असा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे. तर राज ठाकरेंना ईडी काय हे आम्ही सांगायची गरज नाही, त्यांना चांगला अनुभव घेतला असा टोलाही राऊत सांनी लगावला आहे.
खासदार संजय राऊत म्हणाले की, मनसेच्या वाटेला जाण्याएवढा तो पक्ष मोठा नाही, असा टोला खासदार संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना टोला लगावला आहे. महाराष्ट्रात सरकार का पडले हे सर्वांना माहिती, केवळ ईडी, सीबीआयमुळे सरकार पडले हे जर त्यांना समजत नसेल तर त्यांच्या पक्षाचा वाढ व्यवस्थित होणे गरजेचे आहे, राज ठाकरेंना ईडी काय हे वेगळे आम्हाला सांगायची गरज नाही, त्यांनी त्याचा अनुभव घेतला आहे, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे.
संजय राऊत यापुढे बोलताना म्हणाले की, आम्ही अनुभव घेऊनही पक्षाचे काम सुरू आहे. आम्ही महाराष्ट्राची अस्मिता आणि हिंदूत्व हे कधीच सोडले नाही, या विषयावर कधीच आम्ही भूमिका सोडली नाही. शेतकऱ्यांना खते खरेदी करण्यासाठी जात दाखवावी लागतेय, महाराष्ट्र हे पुरोगामी राष्ट्र आहे, केंद्र आणि राज्य सरकारकडून जात आणि धर्म यावर राजकारण सुरू केले आहे. प्रत्येक ठिकाणी राज्यसरकारकडून जात दाखवा म्हणत असेल तर महाराष्ट्रातील जनतेला धर्म काय आहे हे दाखवावा लागेल.
राऊत यापुढे बोलताना म्हणाले की, कसब्याच्या निकालातून मतदार कुठे गेला हे दिसले, नेत्याचे काय घेऊन् बसलात असा टोला संजय राऊत यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना लगावला आहे. लोकसभा आणि विधानसभा एकत्र लढवून भाजपला पराभूत करण्याचा आम्ही निर्धार केला आहे. काल मविआच्या बैठकीत आम्ही चिंचवडला आमच्यात झालेल्या बंडखोरीमुळे निसटता विजय मिळाला असा टोलाही त्यांनी बावनकुळे यांना लगावला.
राऊत यापुढे बोलताना म्हणाले की, सुप्रीम कोर्टात 16 आमदार हे अपात्र ठरणार आहेत. राज्य सरकारचे हे शेवटचे बजेट असणार आहे. त्यामुळे सरकार कोसळण्याच्या भीतीने हे बजेट सादर केले आहेे. यात केवळ घोषणा आहेत, तिजोरीत पैसे नसताना घोषणा करून काय होणार असेही त्यांनी म्हटले आहे.