मनपा अधिकाऱ्यांना आयुक्तांचे आदेश: म्हणाल्या – दुरुस्त न होणाऱ्या परिवहन कडील बसेस भंगारात काढा


सोलापूर24 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

महापालिका परिवहन उपक्रमाच्या अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या या बैठकीत महापालिका आयुक्तांनी परिवहन उपक्रमाचा सविस्तर आढावा घेतला. महापालिका परिवहन उपक्रमाकडे सध्या 20 बसेस मार्गावर आहेत तर, 59 बसेस बंद अवस्थेत आहेत. त्यापैकी दुरुस्त न होणाऱ्या, वापरात नसलेल्या बसेस भंगारत काढण्याचे आदेश मनपा आयुक्त शितल तेली – उगले यांनी अधिकाऱ्यांना दिले.

Advertisement

महापालिका आयुक्तांनी पदभार घेतल्याच्या दिवशीच महापालिका परिवहन उपक्रमाकडील नुकसान भरपाई प्रकरणी जप्तीचे पथक आल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त शितल तेली – उगले यांनी परिवहन उपक्रमाची आढावा बैठक घेतली.

99 बसेस अद्यापही बंद

Advertisement

जेएनएनयुआरएम या केंद्र शासनाच्या योजनेअंतर्गत यापूर्वी आलेल्या 99 बसेस सध्या बंद अवस्थेत आहेत. हे प्रकरण न्याय प्रविष्ट असल्याने यासंदर्भात कोणतीही कार्यवाही करता येणार नाही, असेही त्यांनी सांगितले. तसेच परिवहन उपक्रमाकडून विविध प्रकारची किती देणी आहेत. याचीही माहिती त्यांनी यावेळी घेतली. परिवहन उपक्रमाची सर्व माहिती घेतल्यानंतर पुढील नियोजन करण्यात येणार असल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले.

पथदिवे बंद आढळल्यास तक्रार करावी

Advertisement

दरम्यान, पथदिवे बंद राहू नये यासाठी दक्षता घ्यावी यासंदर्भात महापालिका विद्युत विभागास आदेश दिले आहेत. पथदिवे बंद आढळल्यास नागरिकांनी महापालिकेच्या ॲपवर तक्रार नोंदवावी, असे आवाहन महापालिका आयुक्त शितल तेली – उगले यांनी केले आहे.

सार्वजनिक नळ बंद करण्याशिवाय पर्याय नाही

Advertisement

शासनाकडून मिळणाऱ्या अमृत योजनेचा निधी महापालिकेसाठी आवश्यक आणि महत्त्वाचा आहे. त्यामुळे शासनाच्या निकषानुसार सोलापूर शहरातील सर्व सार्वजनिक नळ बंद करण्याशिवाय पर्याय नाही. यामुळे यापुढेही नळतोड मोहीम सुरूच राहील, असे महापालिका आयुक्त शितल तेली – उगले यांनी सांगितले.

स्वच्छतागृहांची दुरुस्ती व स्वच्छतेचे नियोजन

Advertisement

महापालिकेची आर्थिक स्थिती सक्षम नसल्याने सोलापूर शहरातील महिला व पुरुषांसाठीच्या स्वच्छतागृहांची दुरुस्ती व स्वच्छतेच्या कामासाठी सीएसआर फंडातून निधी मिळू शकतो का ? याचा विचार सुरू आहे. शहरातील या स्वच्छतागृहांची नेमकी संख्या किती व तिची सद्यस्थिती काय आहे? याचीही माहिती घेण्यात येत आहे. त्यानंतर या स्वच्छतागृहांची दुरुस्ती करणे , स्वच्छता करणे ही कामे यातून हाती घेण्याचे नियोजन करण्यात येईल, असेही महापालिका आयुक्तांनी यावेळी स्पष्ट केले.

Advertisement
बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement