मधमाशी दिवस: देशाची वाटचाल ‘मधुरक्रांती’च्या दिशेने- नारायण राणे, मधमाशी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचा हिरक महोत्सव साजरा


पुणे4 तासांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

देशात मागील आर्थिक वर्षात ७५ हजार टन नैसर्गिक मधाची निर्यात झाली असून, त्यातून बाराशे कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. मध उद्योगाची उलाढाल तीन हजार कोटी रुपयांवर गेली असून, देश ‘मधुरक्रांती’ च्या दिशेने वाटचाल करत आहे. अशी माहिती केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी शनिवारी दिली.

Advertisement

जागतिक मधमाशी दिवस आणि केंद्रीय मधमाशी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (सीबीआरटीआय) हीरक महोत्सवानिमित्त पाषाण येथील आयआयटीएम संस्थेत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. केंद्रीय सूक्ष्म,लघू आणि मध्यम उद्योग राज्यमंत्री भानूप्रताप सिंह वर्मा, खादी व ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष मनोज कुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी विनीत कुमार, सह मुख्य कार्यकारी अधिकारी एस.एम. शुक्ला, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजन बाबू, आयोगाचे सदस्य नागेंद्र रघुवंशी, डॉ.शिरीष केदारे,पंकज बोडके आदी उपस्थित होते. या प्रसंगी प्राईम मिनिस्ट्रर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्र्रॅम(पीएमईजेपी) अंतर्गत देशभरातील ६ हजार ८१९ लाभार्थ्यांना तीनशे कोटी रुपये मार्जिन मनी अनुदानाचे वाटप करण्यात आले. त्यामध्ये महाराष्ट्रातील १९१ लाभार्थ्यांना ९.८१ कोटी रुपये अनुदान देण्यात आले.

राणे म्हणाले की, पृथ्वी आणि पर्यावरणाला सुदृढ राखण्यात मधमाशी आणि परागकणांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. देशात हनी इंडस्ट्री वाढीस लागली आहे. खादी व ग्रामोद्योग आयोगाच्या माध्यमातून हनी मिशन राबविण्यात येत असून, त्या अंतर्गत गेल्या वर्षी १८ हजार लाभार्थ्यांना एक लाख ८० हजार मधपेट्या वितरित करण्यात आल्या आहेत. त्यातून मध उत्पादनाला प्रोत्साहन, स्वयंरोजगाराच्या संधींमध्ये वाढ, शेतकर्‍यांना अतिरिक्त उत्पन्न आणि पीक उत्पादनात वृद्धी होत आहे. केंद्रीय मधमाशी संशोधन व प्रशिक्षण संस्था हनी मिशनमध्ये प्रभावी योगदान देत असून, संस्थेने आगामी काळात मध संशोधन, क्षमतावृद्धी, बाजारपेठीय संपर्क व विपणनासाठी प्रयत्न करावे, अशी सूचनाही राणे यांनी केली.

Advertisement

भानुप्रतापसिंग वर्मा वर्मा म्हणाले की, देशाच्या जीडीपी मध्ये एक तृतियांश हिस्सा एमएसएमई सेक्टरचा आहे. जगभरातील निर्यातीतही एमएसएमई सेक्टरचा हिस्सा चाळीस टक्के आहे. ग्रामीण क्षेत्रात मधमाशीपालन उद्योगास अनुकूल वातावरण आहे.

मधमाशी पालन क्षेत्र देशासाठी लाभदायक असून,अल्प गुंतवणुकीतून खात्रीशीर उत्पन्न देणारे उपजीविकेचे साधन ठरले आहे. त्याला चालना देण्यासाठी देशात ३९ हनी क्लस्टर स्थापन करण्यात आले आहेत. भारतीय अर्थव्यवस्था २०२५ पर्यंत पाच ट्रिलियन डॉलरचे उद्दिष्ट गाठून तिसरे स्थान पटकावेल, असा विश्वासही वर्मा यांनी व्यक्त केला.

AdvertisementSource link

Advertisement