नाशिक19 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
सनातन वैदिक धर्म हे देशाचे व आपले मूळ असून आज जगभर भारतीय संस्कृतीने अंगीकारलेल्या आयुर्वेदावर संशोधन सुरू आहे. देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी सनातन वैदिक धर्म व संस्कृती टिकणे गरजेचे असल्याचे मत आमदार ॲड. राहुल ढिकले यांनी व्यक्त केले. महर्षी गौतम गोदावरी वेदविद्या प्रतिष्ठान व शृंगेरी मठातर्फे १० दिवसीय संस्कृत संभाषण वर्गाच्या समारोपप्रसंगी ॲड. ढिकले बाेत हाेते.
यावेळी त्यांनी प्रतिष्ठानच्या पाठशाळेच्या जागेचा प्रश्न सोडविण्याची ग्वाही दिली. प्रमुख पाहुणे माजी उपमहापौर गुरूमीत बग्गा, सामाजिक कार्यकर्ते पदमाकर पाटील, शृंगेरी मठाचे रामगोपाल अय्यर, कैलास सोनवणे, वेदमूर्ती हरिष जोशी, संचालक पंडित गौतम दवे, प्रवीण भाटे आदी उपस्थित होते. पाठशालेचे प्रधानाचार्य रवींद्र पैठणे यांनी प्रास्ताविकातून प्रतिष्ठानतर्फे सुरू असलेल्या विविध सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमांची माहिती दिली. संस्कृत ही भारतीय भाषांची जननी असून विश्वाला सनातन धर्माची देणं देण्याचे काम करणारी ही भाषा टिकून रहावी, अशी अपेक्षा माजी उपमहापौर गुरुमित बग्गा यांनी व्यक्त केली. देशात एकीकडे धर्मांतरे जोरात सुरू असताना हिंदू संस्कृती टिकून राहणे गरजेचे असल्याचे मत पद्माकर पाटील यांनी व्यक्त केले.