मतमोजणी: बेळगाव महापालिका निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात, भाजप बहुमताच्या दिशेने; मतदारांची उत्सुकता शिगेला


Advertisement

बेळगाव2 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक
  • महाराष्ट्र एकीकरण समितीचे शिवाजी मंडोळकर यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले आहे

बेळगाव महापालिका निवडणुकींची मतमोजणी आज होत आहे. मतमोजणीला सुरुवात झाली आहे. या निवडणुकीत कमी मतदान झाल्याने उत्सुकता कमालीची ताणली गेली आहे. सुरुवातीच्या कलांनुसार भाजप हे बहुमताच्या दिशेने आहे. या निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच राष्ट्रीय पक्ष म्हणजे भाजप आणि काँग्रेस देखील रिंगणात उतरले होते. महत्त्वाचे म्हणजे यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे देखील तगडे आव्हान आहे.

Advertisement

एक निकाल हाती
बेळगावातील एक निकाल हाती आला आहे. वॉर्ड क्रमांक 14 मधून महाराष्ट्र एकीकरण समितीचे शिवाजी मंडोळकर यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले आहे. मतमोजणी केंद्रावर कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच मतमोजणी केंद्राच्या आवारात कलम 144 जारी करण्यात आला आहे. यासोबतच शहरामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी 1500 पोलिसांची नेमणूक करण्यात आली आहे.

एकूण 58 जागांसाठी ही निवडणूक झाली. यासाठी तब्बल 358 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. विशेष म्हणजे यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांसह सर्वपक्षीय उमेदवारांनी आपापल्या पक्षीय चिन्हावर निवडणूक लढवली. अनेक दिग्गज नेते हे प्रकाराच्या रिंगणात उतरले होते. सर्वांनीच महापालिका काबीज करण्याच्या घोषणा दिलेल्या आहे. आता त्याला प्रत्यक्षात मतदारांनी कोणाच्या गळ्यात माळ टाकली आहे हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल.

Advertisement

बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here