औरंगाबाद7 मिनिटांपूर्वी
Advertisement
- कॉपी लिंक
जिल्हा कण्व ब्राह्मण समाजातर्फे मकरसंक्रांतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष सी.एस. लक्ष्मीकांत जयपूरकर यांनी २५ व २६ फेब्रुवारी रोजी संस्थेचे राष्ट्रीय अधिवेशन होणार असल्याची घोषणा केली. समाजाच्या वतीने नुकताच कार्यक्रम झाला. उद्योग निरीक्षक स्वप्ना कुलकर्णी यांची विजया कुलकर्णी यांनी प्रकट मुलाखत घेतली. स्वप्ना कुलकर्णी म्हणाल्या, मुख्यमंत्री रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून महिलांनी १० टक्के गुंतवणूकीतून व्यवसाय उभारावा. योजनेत ५० लाखांचे कर्ज मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीकांत जयपूरकर यांनी उपक्रमांची माहिती दिली.
Advertisement
बातम्या आणखी आहेत…
Advertisement