मुंबई8 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
मंत्रीपदाच्या पाच वर्षात सिंधुदूर्ग जिल्ह्याचा सगळा खर्च मी माझी प्रॉपर्टी विकून केला आहे. मग आम्ही गद्दार कसे? असा सवाल राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केला आहे. सावंतवाडी येथे झालेल्या शिवसेना मेळाव्यात ते बोलत होते.
नक्की काय म्हणाले केसरकर?
आम्हाला हे गद्दार म्हणत आहेत पण खरे गद्दार हे आहेत. यांना पाहिजे त्यावेळी आम्ही पैसा पुरवला. मंत्रीपदाच्या पाच वर्षात सिंधुदूर्ग जिल्ह्याचा सगळा खर्च मी माझ्या प्रॉपर्टी विकून केलेला आहे. मग यांना आम्हाला गद्दार म्हणण्याचा काय अधिकार आहे? असा सवाल राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केला.
पुढे बोलताना ते म्हणाले, महाविकास आघाडी बनली, ती कोणाला पटली नाही. महाराष्ट्राच्या जनतेशी गद्दरी केलेली चूकीची होती. केलेल्या उपकाराची जाण नसलेली माणसे सत्तेवर होती. मी काजू धोरण सादर केले. त्याला अन्य मंत्री मान्यता देण्यास सांगायचे. पण, आमचे तत्कालीन मुख्यमंत्री हसायचे. त्यांना काजू धोरण म्हणजे काय? हे त्यांना माहित नव्हते. काजूचे झाड, काजूची बी, काजूचे बोंड म्हणजे काय माहित नाही. असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.
माझे साडेचारशे कोटी अजित पवारांनी काढून घेतले तेंव्हा आदित्य ठाकरे हसत होते. त्याचा व्हिडीओ पूर्ण कोकणात दाखविला पाहिजे. कोकण कधीही अवहेलना सहन करणार नाही असे ते पुढे म्हणाले. आम्ही जनतेने दिलेल्या निर्णयाच्या बाजूने उभे आहोत. खोक्याचा अर्थ काय? आम्ही पैसे घेऊन कुठे गेलोय असा सवाल करत केसरकर यांनी ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला.