- Marathi News
- Local
- Maharashtra
- Marathwada Cabinet Meeting Live Update; Eknath Shinde Ajit Pawar | Inauguration Various Projects | Chhatrapati Sambhaji Nagar
छत्रपती संभाजीनगर41 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
छत्रपती संभाजीनगर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळ सदस्य यावेळी उपस्थित होते. या बैठकीत मराठवाड्यासाठी सिंचन, पायाभूत सुविधा तसेच पर्यटन वाढीसाठीच्या प्रकल्पांना राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. तसेच अनेक प्रकल्पांच्या सुधारित प्रस्तावांना देखील मान्यता देण्यात आली. यामुळे मराठवाड्यातील सिंचनाच्या स्थितीत सुधारणा होणार असल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदमध्ये केला.
मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले महत्त्वाचे निर्णय वाचा…
- मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर जलसिंचन होणार. 11 जलसंपदा प्रकल्पांना मान्यता. 13 हजार 677 कोटींचा सुधारित वाढीव खर्च मंजूर .
- अंबाजोगाई तालुक्यात लाल कंधारी, देवणी देशी गोवंशाचे जतन करणार
- छत्रपती संभाजीनगरला फिरत्या भ्रूण प्रत्यारोपण प्रयोगशाळेची स्थापना
- ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणासाठी 1076 कोटींची वाढीव तरतूद. मराठवाड्यातील 12 लाखांपेक्षा जास्त महिलांना लाभ.
- हिंगोली येथे नवीन वैद्यकीय शासकीय महाविद्यालय. 485 कोटी खर्चास मान्यता
- राज्यातील वरिष्ठ निवासी डॉक्टर्सना 85 हजार रुपये दरमहा मानधन. 12.85 कोटी खर्च
- सौर ऊर्जा कुंपणासाठी रक्कम थेट हस्तांतरित होणार
- समग्र शिक्षामधील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनात 10टक्के वाढ.
- राज्यातील शाळा आता दत्तक घेता येणार गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी निर्णय.
- सिल्लोड येथे दिवाणी न्यायालय
- परळी वैजनाथ येथे नवीन शासकीय कृषी महाविद्यालय
- परळी वैजनाथ येथे नवीन शासकीय कृषी व्यवसाय व व्यवस्थापन महाविद्यालय
- परळी वैजनाथ येथे सोयाबीन संशोधन प्रशिक्षण व प्रक्रिया उपकेंद्र. सोयाबीन उत्पादनास गती येणार
- सोयगाव तालुक्यात शासन अनुदानित कृषी महाविद्यालय
- नांदेड येथे नवीन शासकीय कृषी महाविद्यालय
- धाराशिव येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी जागा
- जालना येथे आयटीआय इन्क्युबेशन सेंटर स्थापणार. 10 कोटीस मान्यता
- गोर (बंजारा) समाज भवनासाठी नवी मुंबई येथे भूखंड देणार
- राज्यात ‘मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण’ अभियान राबविणार
- 2005 पूर्वी नियमित पदावर अस्थायी सेवेतील कार्यरत आणि 2009 मध्ये नियमित सेवेत असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना मॅटच्या आदेशाचा लाभ
मंत्रिमंडळ बैठकीविषयी खालील बातम्या देखील वाचा…
मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा:दुष्काळ स्थिती भोगणाऱ्या मराठवाड्यावर सरकारचा 45 हजार कोटींच्या निधीचा पाऊस
मराठवाड्यासाठी महत्त्वाची असलेले राज्य मंत्रिमंडळाची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी दुष्काळग्रस्त मराठवाड्यासाठी 45 हजार कोटींच्या निधीची घोषणा केली आहे. यात सिंचनासाठी 27 हजार कोटींच्या निधीला मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. यासह नदीजोड प्रकल्पाला देखील 14 हजार कोटींच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. म्हणजेच आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत 59 कोटी रुपयांच्या प्रकल्पांना मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. या माध्यमातून दुष्काळग्रस्त मराठवाड्याला मोठा दिलासा दिला असल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला. पूर्ण बातमी वाचा…
आदर्श पतसंस्था घोटाळा प्रकरण:आरोपीची संपत्ती विकून ठेवीदारांना त्यांचा पैसा वापस करणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
मंत्रिमंडळाच्या बैठकीवर आदर्श ठेवीदारांचा मोर्चा काढण्यात आला होता. ठेवीदार आक्रमक झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरोपीची संपत्ती विकून ठेवीदारांना त्यांचा पैसा वापस करणार आहोत, अशी ग्वाही दिली आहे. पूर्ण बातमी वाचा…