‘भोंगा’वाद: धमकी देऊ नका, आम्ही हातात बांगड्या भरल्या नाहीत; अबू आझमींचा राज ठाकरेंना इशारा


मुंबई3 तासांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमींनी मनसे प्रमुख राज ठाकरेंना थेट इशाराच दिला आहे. धमक्या देऊ नका, आम्ही हातात बांगड्या भरल्या नाहीत, असे म्हणत हनुमान चालिसा म्हणा मात्र आमच्या मशिदीसमोर येऊन नये असा इशारा आझमींनी दिला आहे. राजकारणासाठी इतक्या खालच्या पातळीला उतरु शकतात हेच मुळात योग्य नाही. असा टोला अबु आझमी यांनी राज ठाकरेंना लगावला आहे. यावेळी बोलताना त्यांनी खासदार नवनीत राणांवरही टीकास्त्र सोडले आहे. हनुमान चालिसा पठणाला कुणाचा विरोध नाही मात्र कुणाला चिडवण्यासाठी तुम्ही जर जाणार असताल तर आम्ही शांत बसणार नाही असेही त्यांनी म्हटले आहे.

Advertisement

नेमके काय म्हणाले अबू आझमी?
सर्व लोकांनी आपल्या धर्मांच्या वाटेवर चालावे, या पेक्षा दुसरी चांगली गोष्ट कोणती असू शकते असेही त्यांनी म्हटले आहे. तुम्ही जर मंदिराजवळ हनुमान चालिसा पठण करणार असाल तर चांगले आहे. आम्ही तिथे शरबत आणि पाण्याची व्यवस्था करू असेही त्यांनी म्हटले आहे. कुणाला त्रास होत असेल तर त्यांनी पोलिसात जावे, मात्र कायदे हातात घेऊ नये. जास्त करताल तर तुमच्या कृतीला प्रतिउत्तर मिळेलच मग बघू काय होते ते असा इशाराही त्यांनी राज ठाकरेंना दिला आहे.

राज ठाकरेंचे राजकारण संपले आहे, त्यांचे नाव कुठेतरी चर्चेत रहावे यासाठी हा सर्व केविलपणा प्रयत्न सुरू आहे. त्यांना कुणी विचारणारे राहिले नाही, त्यामुळे कधी झेंडा बदलतात तर कधी भूमिका असे म्हणत आझमी यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

Advertisement

उत्तर भारतीय आणि मराठी लोकांमध्ये भांडणे लावायचे आणि हिंदी आणि मराठीचा वाद उकरून काढायचा हे राज ठाकरेंचे ठरलेले मुद्दे आहेत. स्वत:चे राजकीय स्थान डगमगू नये म्हणून हे सर्व सुरू आहे. मात्र महाराष्ट्रातील जनता हे सर्व गोष्टी पाहते आहे आणि ती राज ठाकरेंना नाकारणार असल्याचा दावा आमदार अबू आझमी यांनी केला आहे.

Advertisement
बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement