भुमरे माझ्या मागे फिरत होते: तिकीट देऊन मीच त्यांना निवडून आणले; खैरेंचा दावा, म्हणाले – आता पैशामुळे मस्ती आली


औरंगाबाद32 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

संदीपान भुमरेंना मी महत्त्व देत नाही. भुमरे माझ्यासमोर नवीन नाही. तो माझ्यासमोर काहीच नाही. त्यांना मीच मोठे केले, मीच त्यांना तिकीट दिले. मीच त्यांना निवडूनही आणले, असा दावा सोमवारी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केला.

Advertisement

मीच सर्व काही केले. आता पैसा मिळत असल्याने त्यांना मस्ती आली आहे, अशी टीकाही खैरे यांनी ‘दिव्य मराठी’ शी बोलताना केली. शिवाय आता भुमरेंच्या मागे ईडी लागणार असल्याचे भाकितही वर्तविले.

मीच भुमरेला मोठे केले

Advertisement

चंद्रकांत खैरे म्हणाले, उद्धव ठाकरेंना मी सांगून त्याला मंत्री केले. शिंदे यांनाही तेव्हा मंत्री करण्याबाबत मीच सांगितले होते. हे भुमरेलाही माहित आहे. त्यानेच माझ्याकडे कबुली दिली होती की, होय साहेब हे खरे आहे.

भुमरेंच्या मागे ईडी लागेल

Advertisement

चंद्रकांत खैरे म्हणाले, भुमरे यांच्याकडे पाचशे एकर जमीन झाली आहे. त्यामुळे हळूहळू बघा आता त्यांच्या मागे ईडी लागणार आहे. इलेक्शन कमिशनकडे फार्म भरलेला आहे. त्याचीही ‘आयटी’कडून चौकशी होणार आहे. भुमरेला उत्तरे देण्याची गरज नाही.

भुमरेंना बोलताही येत नाही

Advertisement

चंद्रकांत खैरे म्हणाले, भुमरेंना बोलता येत नाही. ते गावठी भाषेत बोलतात. मला त्यांची भाषाही आवडत नाही. मी त्यांना महत्त्व देत नाही. पालकमंत्री म्हणून मी तुमच्यापेक्षा चांगले काम करेल, असे ते म्हणतात.

भुमरे माझ्या मागे फिरत होते

Advertisement

चंद्रकांत खैरे म्हणाले, मी पंचवीस वर्षांपूर्वी पालकमंत्री होतो. त्यामुळे मी कसे काम केले ते त्यांनाही माहित आहे. तेव्हा ते माझ्या मागे फिरत होते. तो एकटात आमदार माझ्यासोबत निवडून आला होता. ते आता सुधारले आहेत. त्यांची प्रगती झाली आहे. त्यांनी बारा तारखेला जी धूम केली ती सर्व दुनियेला माहित आहे, त्यांची आगामी काळात चौकशी होणार आहे.

Advertisement
बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement