भीषण अपघात: ब्रेक फेल झाल्याने भरधाव बसची 5-6 गाड्यांना धडक, 2 जणांचा जागीच मृत्यू, 4 जखमी


पुणे21 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

पुण्यातील उंड्री चौकात ब्रेक फेल झालेल्या गाडीने ५ ते ६ गाड्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात २ जणांचा मृत्यू झाला आहे तर चार जण जखमी झाले आहेत.

Advertisement

कोंढवा परिसरातील एनआयबीएम रोड परिसरात रात्रीच्या सुमारास हा अपघात झाला. अचानक ब्रेक फेल झाल्याने समोर असलेल्या वाहनांना धडक दिली आहे. अपघातात एक रिक्षा, टेम्पो, दोन कार, एक दुचाकी, एक चारचाकी वाहनांचा समावेश आहे. जखमींना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

नक्की घडले काय?

Advertisement

रविवारी सायंकाळच्या सुमारास खासगी बस चालली होती. मात्र पुढे जात असताना या बसचा अचानक ब्रेक फेल झाला. त्यामुळे या बसने समोर असणाऱ्या वाहनांना जोरात धडक दिली. त्यामुळे वाहने एकमेकांना अचानकपणे जोरात धडकली. आणि एकमेकांवर जोरात आदळली.

या अपघातात दोघांचा जागेवरच मृत्यू झाला. अन्य चार जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातामुळे रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आणि त्यांनी वाहतूक सुरळीत केली.

Advertisement

जखमींवर उपचार सुरु

या अपघातात प्रशांत भानुदास घेमुड (वय ३७, रा. बधेनगर, कोंढवा खुर्द) आणि एका दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू झाला. तर, रिक्षाचालक मधू कुवर, रिक्षातील प्रवासी अलिस्टर मर्चंट, मालवाहतूक टेम्पोमधील इस्माईल सय्यद, रफिक देशमुख (रा. लेन क्रमांक ३, सय्यदनगर, हडपसर) हे चौघे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर ससून आणि खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

Advertisement

या अपघातात तीन मोटारींसह टेम्पो, रिक्षा आणि एका दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे.Source link

Advertisement