- Marathi News
- Local
- Maharashtra
- Nashik
- Nashik Accident Death Dwarka Adgaon Flyover Container Hits Eicher
नाशिक14 तासांपूर्वी
कॉपी लिंक
नाशिकमधल्या द्वारका-आडगाव उड्डाणपुलावर बंद आयशरला कंटेनरने पाठीमागून धडक दिली. या भीषण अपघातात माय-लेकीचा जागीच मृत्यू झाला. आज सकाळी ही घटना घडली. याबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.
नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. वाहनचालकांची बेबंदशाही, अक्षम्य दुर्लक्षपणा त्यासाठी कारणीभूत ठरत आहे.
नाशिक-मुंबई महामार्गावर द्वारका-आडगाव उड्डाणपूल आहे. मंगळवारी सकाळी या ठिकाणी एक बंद पडलेला आयशर उभा होता. त्याला कंटेरनची पाठीमागून धडक बसली. या अपघातामध्ये कंटरनर चालकाच्या शेजारी बसलेल्या माय-लेकीचा जागीच मृत्यू झाला. इगतपुरीहून धुळ्याकडे हा कंटेनर चालला होता. घटनेनंतर पंचवटी पोलिस ठाण्याचे पोलिस घटनास्थळी पोहचलेत. त्यांनी पुढील तपास सुरू केला आहे.
नाशिक जिल्ह्यात रस्ते अपघातांची संख्या वाढत असून जानेवारी 2022 ते जून 2022 या सहा महिन्यांच्या कालावधीत नाशिक शहर व जिल्ह्यात 602 जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे. मागील काही वर्षांपासून रस्ते अपघातांचे प्रमाण वाढले असून राज्यातील सहा महिन्यांची आकडेवारी पाहता 17 हजार 275 अपघात झाले असून, यात 8 हजार 68 जणांचा विविध अपघातांत मृत्यू झाला आहे.
14 हजार 200 जण कायमचे जायबंदी झाले आहेत. नाशिक जिल्ह्यात 518 व शहरात 102 अपघाती मृत्यू झाले आहेत. राज्यातील आकडेवारी बघता नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. रस्ते अपघात रोखण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाकडून प्रभावी नियोजन होत नसल्याने अपघातांची संख्या वाढत आहे.
इतर बातम्याः
अमरावतीत भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू, लग्नसोहळ्याहून परतत असतानाच काळाचा घाला
ईडी चौकशीनंतर अजित पवारांचा फोन नाही; जयंत पाटील यांची प्रतिक्रिया, नाराजीच्या चर्चेने धरला जोर!
2024ला ईडी कार्यालयात कोणा-कोणाला पाठवायचे, याची यादी लवकरच जाहीर करू- संजय राऊत
मुंबईत बॉम्बस्फोट घडवणार, पोलिसांना ट्विटरवरून धमकी; सलग दुसऱ्या इशाराने खळबळ