भीषण अपघात: नंदुरबारच्या चांदशैली घाटात पिकअप दरीत कोसळली; 4 जणांचा मृत्यू तर 2 जखमी


नंदुरबारएका तासापूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

नंदुरबार जिल्ह्यातील चांदशैली घाटात एका पिकअप वाहनाचा भीषण अपघात झाला आहे. घाटात रस्ता खराब असल्याने आणि नागमोडी वळणाचा तीव्र उताराचा असलेल्या, पिकअप गाडीत प्रवासी करणाऱ्या 4 प्रवाशांनी आपला जीव गमावला असल्याची माहिती मिळाली आहे.

Advertisement

चांदसैली घाट मार्गामुळे धडगाव तालुक्याला नंदुरबार जिल्ह्याची जोडणारा आणि कमी अंतराचा मार्ग आहे. या ठिकाणावरुन मोठ्या प्रमाणात प्रवासी वाहतूक होत असते. गेल्या दोन वर्षांपासून या घाटाची अत्यंत दुरावस्था झाली आहे. जागोजागी रस्ता खचलेला असून नेहमीच लहान मोठे अपघात होत असतात. वावी ता.धडगाव येथून घराची कौले घेण्यासाठी चांदसैली मार्गे वेलदा ता.निझर या ठिकाणी जात असताना काळाने यांवर झडप घातली.

चांदसैली घाट मृत्यूचा सापळा बनला आहे. आज ही मनसुन्न करणारी धक्कादायक घटना घडली आहे. 4 मयतांपैकी 3 वावी ता.धडगाव व 1 बोधला ता.धडगाव येथील राहणारे असून जखमी असलेले दोन्ही वावीचे रहिवाशी आहेत.

Advertisement

मयतांची नावे

  • ड्रायव्हर तुकाराम दिवल्या ठाकरे वय 35 रा.वावी,ता.धडगाव
  • विरसिंग रमेश पावरा वय.35,रा.बोधला, ता.धडगाव
  • मुकेश कैला ठाकरे वय 25 रा.वावी,ता. धडगाव
  • अमरसिंग शंकर ठाकरे वय 30 रा.वावी,ता.धडगाव

2 जण जखमी

Advertisement
  • सुरुपसिंग साकऱ्या ठाकरे वय 20 रा.वावी, ता.धडगाव
  • गणेश साकऱ्या ठाकरे वय.15, रा.वावी, ता धडगाव

चौघांचे मृतदेह तळोदा उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनसाठी दाखल करण्यात आले आहे. खराब रस्त्यांमुळे हा भीषण अपघात झाला असल्याचे म्हटले जात आहे. खचलेल्या रस्त्यांमुळे अजून किती प्रवाशांचा जीव प्रशासन घेणार आहे? असा संतप्त सवाल आता नागरिक करू लागले आहेत.Source link

Advertisement