मुंबई36 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
श्री. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे व मनोज जरांगे पाटील यांची झालेल्या भेटीवर देखील राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाले आहे. राष्ट्रवादीते नेते जयंत पाटील यांनी संभाजी भिडे यांच्या भेटीवर प्रश्न चिन्ह उपस्थित केला आहे. नेमका या कोण असेल, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यातील अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसलेले मनोज जरांगे-पाटील यांची श्री. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी भेट घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लबाडी करणार नाहीत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुमची फसवणूक करणार नाहीत, अजित पवार काळीज असलेला माणूस आहे, त्यामुळे कृपया तुमचं उपोषण थांबवा, अशी विनंती संभाजी भिडे यांनी जरांगे पाटलांना केली.
दरम्यान, संभाजी भिडे यांनी जरांगे पाटील यांची घेतलेल्या भेटीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाष्य केले आहे. ‘देवेंद्र फडणवीसांनी संभाजी भिडेंना पाठवलं असेल, तर यापूर्वींची त्यांची विधानं फडणवीसांच्या वाट्याला जातील, असा टोला लगावला. त्यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
भिडेंच्या महापुरुषांबद्दल वादग्रस्त विधानं
एनसीपी नेते जयंत पाटील पुढे बोलताना म्हणाले की, संभाजी भिडे यांनी महात्मा गांधीबद्दल केलेली विधानं अत्यंत आक्षेपार्ह आहेत. तर ज्याकडे सर्व माध्यमांचं लक्ष केंद्रीत असतं, तिथे जाऊन भिडेंनी आपली भूमिका मांडली आहे. देवेंद्र फडणवीसांच्या वतीनं तिथे ते गेले नसतील, ही मला अपेक्षा आहे. देवेंद्र फडणवीसांनी भिडेंना पाठवलं असेल, तर यापूर्वीची त्यांची विधानं फडणवीसांच्या वाट्याला जातील. भिडे स्वत:च गेलेत का? यावर देवेंद्र फडणवीस स्पष्टीकरण देतील, अशी मला अपेक्षा आहे.
काय म्हणाले संभाजी भिडे जरांगे पाटलांना?
तुम्ही मागे वळून पाहायचं नाही, जसं पाहिजे तसं मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे, या निश्चयाने आम्ही तुमच्याबरोबर आहोत. तुम्ही करताय ते अगदी 101 टक्के योग्य करताय, असं संभाजी भिडे जरांगे-पाटलांना म्हणाले. जोपर्यंत राजकारण्यांच्या हातात मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे, शेवाळावरुन चालण्यासारखं आहे. एक चांगलं म्हणजे आता जे राजकारणी सत्तेवर बसलेत, एकनाथ शिंदे अजिबात लबाड नाहीत, देवेंद्र फडणवीस फसवणूक करणार नाहीत, अजित पवार जरी राष्ट्रवादीचे असले, तरी काळीज असलेला माणूस आहे, असं कौतुक देखील भिडे यांनी केले.