नाशिकएका तासापूर्वी
- कॉपी लिंक
अश्व असो की, आग यासोबत चित्त थरारक अशा वेगवेगळ्या प्रात्यक्षिकांद्वारे भोसला सैनिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केल्या कलाकृतींना जोरदार दाद दिली.
प्रत्येकजण विद्यार्थी दक्षेतून वाटचाल करत असतो, ही वाटचाल करतांना विद्यार्थ्यांला वेगवेगळ्या आव्हानांना तोंड द्यावे लागले, या शैक्षणिक प्रवासातील आव्हानांवर मात करत पुढे सक्षमपणे वाटचाल करणारेच खरे विद्यार्थी, सैनिक असतात, असे प्रतिपादन नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले.
भोसला मिलीटरी विद्यालयातर्फे आठवडाभर घेण्यात आलेल्या वार्षिक स्नेहसंमेलनाचा पारितोषिक वितरण समारंभ आणि संचलन माजी विद्यार्थी, रामदंडी ठाकूर – घुगे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. गर्व्हनिंग कौन्सिल कमिटीचे सदस्य नरेंद्र वाणी, महाविद्यालयीन समितीचे अध्यक्ष हेरंब गोविलकर, रामकुमार नायर, प्राचार्य डॉ.उन्मेष कुलकर्णी,उपप्राचार्य जे.एस.भावसार, डॉ.संजय कंकरेज, स्नेहसंमेलन प्रमुख दिपा हिंगे, किरण राजदेरकर, योगेश भदाणे आदी उपस्थित होते.
शानदार संचलन आणि चित्तथरारक कसरती महाविद्यालयाच्या एनसीसी, नेव्हलच्या छात्रांनी शानदार संचलन करून प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिली. यात संचलनात अश्वांनी सहभाग घेतला होता. सामुदायिक कसरती, प्रात्याक्षिकांतून आत्मसंरक्षणाचे धडे दिले. योगासन,जिम्नॅस्टीक कवायतींच्या जोडीला घोष,वाद्यवृंद पथकाचे प्रात्याक्षिकही या सोहळ्याचे आकर्षण ठरले.
आगीतून उड्या घेत विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कसरतींना उपस्थित पालक, शिक्षकांनी दाद दिली. शैक्षणिक प्रवासात उल्लेखनिय यश संपादन करणाऱ्या शिक्षकांचा, विविध पारितोषिके मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा, २६ जानेवारीसाठी निवड झालेल्या छात्रांचा सत्कार करण्यात आला.
दिपा पिंपळे हिला बेस्ट रामदंडीचा किताब (अपूर्वा कोचरगावकर चोरडिया प्रोडक्ट अँन्ड स्टेटेजिक आणि कर्नल प्रशांत नायर बेस्ट रामदंडी अँवार्ड) देण्यात आला. गौरी पंचाक्षरी (बेस्ट भवन(ज्युनिअर भवनसाठी विंग कमांडर दिलीप भागवत ट्रॉफीने) या मानांकित ट्रॉफींनी सन्मान झाला. यावेळी श्री.गोविलकर यांनी शुभेच्छा दिल्या. प्रिंयका अजरपु हिने परिचय करून दिला. स्नेहा कुलकर्णी, गायत्री जोशी, निरंजन गायकवाड यांनी सुत्रसंचालन केले. रोहित शिंदे यांने आभार मानले.
अश्वांच्या कसरती ठरल्या आकर्षण
भोसला सैनिकी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांसोबतच विद्यार्थ्यांनी आश्वाचा मदतीने ज्या चित्त ठरावकाशा प्रत्यक्ष सादर केले त्याला उस्फूर्त दात मिळाली त्याचबरोबर आश्वासन आगीच्या वेगळ्या करामती विद्यार्थ्यांनी दाखवल्याने एक आकर्षण ठरले.