भारत-आफ्रिका कसोटी मालिका : शार्दूलच्या पराक्रमामुळे रंगत!आफ्रिकेकडे पहिल्या डावात २७ धावांची माफक आघाडी; भारत दुसऱ्या डावात २ बाद ८५

Advertisement

वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूरने डावात सात बळी घेण्याचा पराक्रम दाखवत दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव २२९ धावांत गुंडाळला. परंतु तरीही आफ्रिकेने मंगळवारी दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी २७ धावांची माफक आघाडी घेतली.

Advertisement

शार्दूलने उपाहाराआधीच्या पाच षटकांत तीन बळी घेतले. मग दुसऱ्या सत्रात दोन आणि तिसऱ्या सत्रात तळाचे दोन फलंदाज बाद करीत आफ्रिकेच्या फलंदाजीवर अंकुश ठेवला. १७.५-३-६१-७ असे शार्दूलच्या गोलंदाजीचे कारकीर्दीतील सर्वोत्तम असे भेदक पृथक्करण होते. त्याने डावात पाच बळी घेण्याचे यशसुद्धा प्रथमच मिळवले.

सेंच्युरियनची पहिली कसोटी गमावणाऱ्या आफ्रिकेने कीगान पीटरसन (६२) आणि तेंबा बव्हुमा (५१) यांच्या अर्धशतकांच्या बळावर आघाडी घेत सामन्यातील चुरस कायम राखली आहे.

Advertisement

दुसऱ्या दिवसाच्या खेळाला प्रारंभ झाल्यानंतर दीड तासानंतर शार्दूलने भारताला पहिले यश मिळवून दिले. कर्णधार डीन एल्गर यष्टिरक्षक ऋषभ पंतकडे झेल देऊन माघारी परतला. मग कारकीर्दीतील पहिले अर्धशतक साकारणाऱ्या पीटरसनचा अडसर शार्दूलने दूर केला. स्लिपमध्ये मयांक अगरवालकडे झेल देऊन तो माघारी परतला. पहिल्या सत्राच्या अखेरच्या चेंडूवर रॅसी व्हॅन दर दुसेन (१) निराशाजनक पद्धतीने बाद झाला.

मग दुसऱ्या सत्रात बव्हुमा आणि काइल व्हेरेयने जोडीने पाचव्या गड्यासाठी ६० धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. शार्दूलनेच व्हेरेयनेला (२१) बाद करून ही जोडी फोडली. अर्धशतक पूर्ण होताच बव्हुमा पंतकडे झेल देऊन माघारी परतला. कॅगिसो रबाडाला मोहम्मद शमीने भोपळाही फोडू दिला नाही.

Advertisement

त्यानंतर मार्को जॅन्सन (२१) आणि केशव महाराज (२१) यांनी आठव्या गड्यासाठी ३८ धावांची भागीदारी करीत आफ्रिकेला भारताची धावसंख्या ओलांडून दिली. जसप्रीत बुमराने महाराजचा त्रिफळा उडवून ही भागीदारी खंडित केली. मग मार्कोने शार्दूलच्या गोलंदाजीवर उंच फटका खेळण्याचा प्रयत्न फसला आणि रविचंद्रन अश्विनने तो सुरेख झेलला. तीनच चेंडूंच्या अंतराने शार्दूलने लुंगी एन्गिडीला (०) बाद करीत आफ्रिकेचा पहिला डाव संपुष्टात आणला.

उत्तरार्धात आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाजांनी भारताच्या दोन सलामीवीरांना ४४ धावांत तंबूत धाडले. पहिल्या डावातील अर्धशतकवीर राहुलला फक्त ८ धावांवर जॅन्सनने बाद केले, तर खेळपट्टीवर स्थिरावू पाहणाऱ्या मयांकला ड्युआने ऑलिव्हरने (२३) आश्चर्यकरीत्या पायचीत केले. चेतेश्वर पुजारा-अजिंक्य रहाणे यांच्याकडून संघाला अपेक्षा आहेत.

Advertisement

संक्षिप्त धावफलक

’ भारत (पहिला डाव) : २०२

Advertisement

’ दक्षिण आफ्रिका (पहिला डाव) : ७९.४ षटकांत सर्व बाद २२९ (कीगान पीटरसन ६२, तेंबा बव्हुमा ५१; शार्दूल ठाकूर ७/६१, मोहम्मद शमी २/५२)

’ भारत (दुसरा डाव) : ११.४ षटकांत २ बाद ४४ (मयांक अगरवाल २३, के. एल. राहुल ८; मार्को जॅन्सन १/१)    (धावफलक अपूर्ण)

Advertisement

The post भारत-आफ्रिका कसोटी मालिका : शार्दूलच्या पराक्रमामुळे रंगत! appeared first on Loksatta.Source link

Advertisement