भाजप-शिवसेनेत धुसफूस: खासदार गजानन कीर्तीकर यांनी व्यक्त केली मनातली खदखद; देवेंद्र फडणवीस यांचा पडदा टाकण्याचा प्रयत्न


22 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यातील धुसफूस आता समोर आली आहे. भाजपकडून शिंदे गटाच्या खासदारांना सापत्न वागणूक मिळत असल्याचा खळबळजनक आरोप खासदार गजानन कीर्तिकर यांनी केला होता. यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. शिवसेना आणि भाजप दोन्ही पक्ष अत्यंत समन्वयाने काम करत असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ते अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

Advertisement

खासदार गजानन कीर्तिकर यांनी लोकसभेच्या 22 जागांवर केलेला दावा आणि भाजपकडून होणाऱ्या सापत्न वागणूकीबाबत पत्रकारांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारले. यावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘शिवसेना आणि भाजपमध्ये कोणतीही समस्या नाही. हे दोन्ही पक्षा अत्यंत समन्वयाने काम करत आहे. या पुढील काळात देखील आमचे काम सुरूच राहणार आहे. जागा वाटपाबाबत आमच्या सर्व गोष्टी ठरल्या नाहीत, जेव्हा त्या ठरतील तेव्हा आम्ही तुम्हाला नक्की सांगू, असे देखील फडणवीस म्हणाले. एकंदरीत गजानन कीर्तिकर यांनी व्यक्त केलेल्या खदखदीवर फडणवीस यांनी पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

काय म्हणाले होते गजानन कीर्तिकर
आम्ही तेरा खासदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत आलो आहोत. आमचा शिवसेना हा पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा म्हणजेच एनडीएचा घटक पक्ष आहे. मात्र, घटक पक्ष असलो तरी त्या प्रमाणात आमची कामे होत नाही. भाजपकडून आम्हाला अद्याप घटक पक्षाचा दर्जा मिळालेला नाही. भाजपकडून आमच्या खासदारांना सापत्न वागणूक मिळत असण्याची तक्रार आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली असल्याची माहिती गजानन कीर्तिकर यांनी प्रसार माध्यमांना दिली होती.

Advertisement

2019 मध्ये भाजप – शिवसेना एकत्र असताना शिवसेनेने 23 तर भाजपने 26 जागा लढवल्या होत्या. त्यापैकी 22 जागांवर भाजपचे आणि 18 जागांवर शिवसेनेचे खासदार निवडून आले होते. आगामी लोकसभा निवडणुकीत देखील ते सूत्र कायम राहणार असल्याचा दावा गजानन कीर्तिकार यांनी केला होता.



Source link

Advertisement