भाजप लोकशाही संपविण्याचे काम करत आहे: मनमानी कारभाराला जनता येत्या निवडणुकीत चोख उत्तर देईल- अरविंद शिंदे

भाजप लोकशाही संपविण्याचे काम करत आहे: मनमानी कारभाराला जनता येत्या निवडणुकीत चोख उत्तर देईल- अरविंद शिंदे


  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • BJP Is Working To End Democracy, People Will Give A Befitting Answer To BJP’s Arbitrary Rule In Upcoming Elections Arvind Shinde

पुणे21 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

लोकशाही आणि राज्य घटना संपविण्याचे काम भाजप करीत आहे या मनमानी कारभाराला सर्वसामान्य जनता आता कंटाळली आहे. येत्या निवडणुकीत जनता या भाजपाच्या मनमानी कारभाराला चोख उत्तर दिल्या शिवाय राहणार नाही असा विश्वास काँग्रेस पुणे शहर अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी व्यक्त केला.

Advertisement

पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदार संघात चिखलवाडी येथील बुद्ध विहारात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अरविंद शिंदे, दीप्ती चौधरी, विनोद रणपिसे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून जनसंवाद पद यात्रेची सुरुवात करण्यात आली. खडकी स्टेशन, एल आय सी रोड, औंध रोड चौक, पडाळ वस्ती, छत्रपती शिवाजी उद्यान, भीमज्योत नगर भाजी मंडई, या मार्गातून यात्रा काढण्यात आली आणि समारोप सभा डॉ. बाबसाहेब आंबेडकर बोपोडी चौकात घेऊन करण्यात आला.

याप्रसंगी माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, महा. प्रदेश सरचिटणीस अभय छाजेड, माजी महापौर कमल व्यवहारे, माजी. उपमहापौर रजनी त्रिभुवन, माजी नगरसेविका लता राजगुरू, काँग्रेस सरचिटणीस पुणे शहर विनोद रणपिसे, कैलास गायकवाड, ऍड. नंदलाल धीवार, अध्यक्ष शिवाजी नगर काँग्रेस ब्लॉक कमिटी अजित जाधव, बोपोडी काँग्रेस ब्लॉक कमिटी अध्यक्ष विशाल जाधव, राजेंद्र भुतडा, डी वाय एस पी अनिल पवार, किशोर वाघमारे, विजय कांबळे, योगेश पवार, रमा भोसले, कांता ढोणे, माया मोरे, सुंदरताई ओव्हाळ,विमल खांडेकर, अरुणा चेमटे, उषा जाधव, प्रियांका मधाळे, प्राजक्ता गायकवाड, ऍड. विठ्ठल आरुडे यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Advertisement



Source link

Advertisement