मुंबई15 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
आत्महत्येपूर्वी नितीन देसाई दिल्लीत जाऊन भाजप नेत्यांना भेटले होते. मात्र, त्यांना कोणतीही मदत मिळाली नाही, असा आरोप आज ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. त्यावरून आता यापुन्हा एकदा आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी नितीन देसाई आत्महत्या प्रकरणावरून थेट उद्धव ठाकरेंनाच लक्ष्य केले आहे.
माझ्याकडे खात्रीलायक माहिती
भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी संजय राऊतांवर पलटवार करत, देसाई यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती, असा दावा केला आहे. दरेकर म्हणाले, नितीन देसाई हे उद्धव ठाकरेंकडे मदत मागायला गेले होते याची माझ्याकडे खात्रीलायक माहिती आहे. ठाकरेंचे प्रवक्ते संजय राऊत त्यांच्या मृत्यूचे जे भांडवल करत आहेत, जे राजकारण करत आहेत, ते अत्यंत चुकीचे आहे
उद्योजकांची यादीच जाहीर करेल
प्रवीण दरेकर म्हणाले, नितीन देसाई यांनी मदतीसाठी उद्धव ठाकरेंची मदत घेतली होती की नाही. माझा दावा हा खरे आहे की नाही याचे उत्तर संजय राऊत यांनी द्यावे. तसेच, अनेक मराठी उद्योजक उद्धव ठाकरेंकडे मदत मागायला गेले होते. पण, त्यांनी त्यांना तिकडून हाकलून दिलं, याची यादी मी जाहीर करणार आहे, असा इशाराही दरेकरांनी दिला.
4 जणांविरोधात गुन्हा दाखल
दरम्यान, कला दिग्दर्शक नितीन देसाई आत्महत्या प्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याबाबत राज कुमार बन्सल, रेशेश शाह आणि अन्य दोघांविरोधात खालापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. देसाई यांच्या पत्नी नेहा देसाई यांनी खालापूर पोलिस ठाण्यात लेखी तक्रार केली होती. त्यानुसार केयुर मेहता, रशेष शहा, स्मित शहा, ईएआरसी कंपनीचे आर के बन्सल, प्रशासक जितेंद्र कोठारी यांच्यावर गुन्हा दखल झाला आहे. डोक्यावर कर्जाचा बोझा वाढल्याने नितीन देसाई यांनी 2 ऑगस्ट रोजी त्यांच्या एनडी स्टुडिओमध्ये आपली जीवनयात्रा संपवली.
संबंधित वृत्त
संजय राऊतांचा भाजपवर गंभीर आरोप:आत्महत्येपूर्वी नितीन देसाई दिल्लीत नेत्यांना भेटले होते, मात्र सनी देओलप्रमाणे दिलासा नाही
सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्येप्रकरणी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. आत्महत्येपूर्वी थकीत कर्जाच्या बाबतीत काही मदत मिळावी म्हणून नितीन देसाई दिल्लीत जाऊन भाजप नेत्यांना भेटले होते. मात्र, त्यांना कोणतीही मदत मिळाली नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. वाचा सविस्तर