भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंची ‘मविआ’ वर टीका: वज्रमुठ केव्हाच जीर्णमुठ झाली म्हणून प्रत्येकजण एकेकटा फिरतोय

भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंची ‘मविआ’ वर टीका: वज्रमुठ केव्हाच जीर्णमुठ झाली म्हणून प्रत्येकजण एकेकटा फिरतोय


नागपूर2 तासांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

अजितदादा भाजपासोबत आल्यानंतर महाविकास आघाडीची वज्रमूठ तुटली आहे. या वज्रमुठीला तडा गेला असून तीन पक्षांच्या जाहीर सभाही थांबल्या आहे. आता शरद पवारांपासून उद्धव ठाकरेंपर्यत प्रत्येक जण एकएकटे फिरत आहे, अशी टीका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे प्रसार माध्यमांशी बोलताना केली.

Advertisement

वज्रमुठ सभा घेणाऱ्या उद्धव ठाकरेंना आता एकटे फिरावे लागत आहे. वज्रमुठ आताच जीर्णमुठ झाली आहे. फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीच्या पाठीत त्यांनी खंजीर खुपसला होता. त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागत आहे. इथले इथेच भोगावे लागते. कुठेही जावे लागत नाही, असा टोला उद्धव ठाकरे यांना हाणला.

मी शरद पवारांबद्दल केलेल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. माझ्या बोलण्याच्या वेगळा अर्थ काढण्यात आला. अजित पवारांचे मतपरिवर्तन झाले तसेच आज ना उद्या शरद पवार यांचेही मतपरिवर्तन होऊ शकते, एवढेच मी बोललो होतो. मात्र शरद पवार भाजपात येतील असे मी बोललो नाही असे बावनकुळेंनी स्पष्ट केले. यावर शरद पवार मला मूर्ख म्हणत असतील तर काही फरक पडत नाही.

Advertisement

मी लहान कार्यकर्ता आहे असे ते म्हणाले. छगन भुजबळ पवारांचे जुने सहकारी आहे. शरद पवारांनी पाच-सहा वेळा मोदी तसेच भाजपाच्या जवळ येण्याचा प्रयत्न केला असे भुजबळ म्हणाले होते. मुंबई गोवा हायवेसाठी मनसे आंदोलन करीत आहे ते ठीक आहे. त्या हायवेची परिस्थिती खराब आहे. मात्र हे लक्षात घेतले पाहिजे की हा रस्ता अनेक वर्षापासून खराब आहे. त्यांच्या आंदोलनाची दखल सरकार घेईल आणि रस्ताही चांगला होईल.Source link

Advertisement