भाजपच्या ‘पोपटलाल’वर आता कायदेशीर कारवाई: खासदार संजय राऊत यांचे किरीट सोमय्यांवर शरसंधान, नोटीस पाठवण्याचा इशारा


मुंबई21 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर पुन्हा एकदा शरसंधान साधले आहे. त्यांनी बिनबुडाचे आरोप थांबवले नाही, तर कायदेशीर कारवाई करू. लवकरच त्यांना नोटीस पाठवू, असा इशारा राऊत यांनी दिला आहे.

Advertisement

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुंबई महापालिकेत घोटाळा झाल्याचा आरोप केला. त्यानंतर त्यांनी पुणे महापालिकेतही घोटाळा झाल्याचा दावा केला. यापूर्वी त्यांनी नवाब मलिक, अनिल परब आणि हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केलेत. या साऱ्याला राऊत यांनी उत्तर दिले आहे.

राऊत काय म्हणाले?

Advertisement

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या आरोपाला खासदार संजय राऊत यांनी आज ट्विट करून उत्तर दिले आहे. राऊत आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, भाजपचे किरीट सोमय्या उर्फ ​​पोपटलाल माझ्यावर बिनबुडाचे आरोप करत आहेत. ते शिवसेनेच्या नेत्यांवर चिखलफेक करत आहेत. आता मी त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. श्री पोपटलाल यांना लवकरच कायदेशीर नोटीस दिली जाईल. सत्याचा लवकरच विजय होईल. होऊन जाऊ दे! जय महाराष्ट्र!

100 कोटींचा घोटाळा

Advertisement

किरीट सोमय्या यांनी मुंबईत 100 कोटींचा कोविड सेंटर घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. त्यांनीही एक ट्विट केले आहे. त्यात ते म्हणतात, सुजीत पाटकर (संजय राऊतचे पार्टनर) लाईफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेसना 100 कोटींचे कोविड सेंटर कंत्राट देण्याचा निर्णय बीएमसीने 24 एप्रिल 2020 रोजी घेतला, परंतु कंपनी 26 जून 2020 रोजी अस्तित्वात आली. कंपनीच्या जन्मापूर्वीच हे कंत्राट दिल्याचा दावा त्यांनी केला आहे.

परबांचा साई रिसॉर्ट घोटाळा

Advertisement

किरीट सोमय्या आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, अनिल परब यांच्या साई रिसॉर्ट व अन्य 17 प्रकरणांत खोट्या व बेकायदेशीर पद्धतीने CRZ ना-विकास क्षेत्रात बांधकाम करण्याच्यी परवानगी दिल्याप्रकरणी महाराष्ट्र सरकारने तत्कालीन उपविभागीय अधिकारी दापोली जयराम देशपांडे यांचे निलंबन केले आहे. सोमय्या यांनी गेल्या दोन दिवसांत हे ट्विट केलेत. त्यांनी पत्रकार परिषद घेऊनही आरोप केलेत. त्यामुळे सोमय्या विरुद्ध राऊत असे वाकयुद्ध पुन्हा रंगले आहे.

Advertisement
बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement