भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या हॉटेलात गो मांस विक्री: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा भंडाऱ्यात खळबळजनक आरोप


भंडाराएका तासापूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

गोमांस विक्रीला विरोध करणाऱ्या भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या गोव्यातील हॉटेलमध्ये गोमांस आढळून आले आहे, असा खळबळजनक आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भंडारा येथे माध्यमांशी बोलताना केला.

Advertisement

गो हत्या ला विरोध करणाऱ्या भाजपचे पितळ उघडे पडले आहे. नायजेरियात लम्पी आजार आढळून येतो. नायजेरियातून चिता आणून भाजपने काय साध्य केले, असा प्रश्न उपस्थित करीत भाजप सरकार शेतकरी विरोधी असल्याचा आरोप पटोले यांनी केला.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज भंडारा येथे आले होते. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. त्यानंतर शासकीय विश्रामगृहावर नाना पटोले माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, राहुल गांधी यांची यात्रा नसून, ती आता एक लोक चळवळ झाली आहे. देशात तिरंगा टिकवायचा असल्यामुळे या चळवळीला मोठी प्रतिसाद मिळत आहे.

Advertisement

नायजेरिया देशात लम्पी या आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आहे. त्याच देशातून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चिता भारतात आणला. देशात गरिबी, बेरोजगारी, महागाई, सीमावाद मोठ्या प्रमाणात असताना चिता आणून देखावा करण्याचे काम करण्यात येत असल्याचा आरोप पटोले यांनी केला.

भाजप शेतकरी विरोधी असून त्यांना बरबाद करण्यासाठी लम्पी या रोगाची धास्ती दाखवून गोधन संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे. भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यात मागील काही दिवसापासून सिटी 1 वाघाने धुमाकूळ घातला आहे. हा वाघ भंडारा गोंदिया गडचिरोली या तीन जिल्ह्यात भ्रमंती करीत असून आतापर्यंत 18 जणांचा जीव घेतला आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी पूर्णपणे धास्तावलेले असून शेतीवर जाण्यास धजावत आहेत. अशा नरभक्षी वाघाला कोंबिंग ऑपरेशन करून ठार करावे, अशी पटोले यांनी केली.

Advertisement

बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement