भाजपचा विजय: मुंबई बँक निवडणुकीत भाजपचा विजय, सर्व 21 जागांवर प्रवीण दरेकरांच्या पॅनलचे उमेदवार विजयी; त्यातही 17 बिनविरोध


Advertisement

मुंबईएका तासापूर्वी

  • कॉपी लिंक

मुंबई बँक निवडणुकीमध्ये भाजप आमदार प्रवीण दरेकर यांच्या पॅनेलचे एकहाती वर्चस्व राहिले आहे. प्रवीण दरेकर यांचे सहकार पॅनेल सर्व 21 जागांवर विजयी झाले आहे. यामध्ये 17 जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या होत्या. तर उर्वरीत चार जागांची मतमोजणी आज होणार होती. यामध्ये चारही जागांवर त्यांना विजय मिळवला आहे.

Advertisement

आज झालेल्या मतमोजणीत प्रवीण दरेकर यांच्या सहकार पॅनेलचे चारही उमेदवार विजयी झाले आहेत. मध्यवर्ती ग्राहक मतदार संघामधून विठ्ठल भोसलेंनी सुखदेव चौगुलेंचा पराभव केला आहे. विठ्ठल भोसले यांना 18 मते पडली आहेत. तर सुखदेव चौगुले यांना 16 मते मिळाली आहेत. प्राथमिक ग्राहक मतदार संघामध्ये पुरुषोत्तम दळवी यांनी कमलाकर नाईकांचा मोठ्या पराभव केला आहे.

या विजयानंतर प्रविण दरेकरांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, ‘मुंबई जिल्हा बँकेच्या मतदारांनी आमच्या कारभारावर पुन्हा शिक्कामोर्तब केलेय. अनेक जणांनी मुंबई जिल्हा बँकेच्या कारभाराबाबत टीका केली होती. मात्र, मुंबईतील सहकार चळवळीतील कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा आमच्यावर विश्वास दाखवला आहे.’

Advertisement

बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement