भाजपचं ठरलं, राष्ट्रपती पदासाठी द्रौपदी मुर्मू यांचं नाव जाहीर, जे.पी. नड्डा यांची घोषणा


नवी दिल्ली : भारतीय जनता पार्टीनं राष्ट्रपती निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर केला आहे. झारखंडच्या माजी राज्यापाल द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपनं रामनाथ कोविंद यांना मागील निवडणुकीत उमेदवारी दिली होती. आता यावेळी आदिवासी महिलेला संधी देण्याचा निर्णय भाजपकडून घेण्यात आला आहे. भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी यासंदर्भातील घोषणा केली. भाजपनं राष्ट्रपती पदाचा उमेदवार जाहीर करण्यापूर्वी बैठक घेतली आणि उमेदवार जाहीर केला. त्यापूर्वी विरोधी पक्षांनी यशवंत सिन्हा यांची उमेदवारी घोषित केली आहे. राष्ट्रपती पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख २९ जून आहे. भाजपकडून राष्ट्रपती पदाची निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न करण्यात येत होते. मात्र, विरोधी पक्षांनी देखील उमेदवार जाहीर केला आहे. बिनविरोध निवडणुकीसंदर्भातील चित्र येत्या काळात स्पष्ट होईल.

Advertisement

राष्ट्रपती पदाचा उमेदवार निवडण्यासाठी भाजपच्या संसंदीय बोर्डाची बैठक पार पडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, जे.पी.नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, शिवराज सिंह चौहान यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडली. त्या बैठकीनंतर भाजपकडून उमेदवार जाहीर करण्यात आला आहे.

शिवसेना आमदाराने एकनाथ शिंदेंच्या हातावर तुरी दिल्या, अशी करुन घेतली सुटका, वाचा थरारक प्रसंग!
द्रौपदी मुर्मू या झारखंडच्या माजी राज्यपाल आहेत. पूर्व भारतातील महिला आणि आदिवासी उमेदवार देण्याचा निर्णय घेतल्याचं नड्डा यांनी सांगितलं. मुर्मू या ओडिशा राज्यातील आहेत. द्रौपदी मुर्मू या स्वतंत्र भारतातील पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती होण्याची शक्यता आहे. २०१७ मध्ये देखील द्रौपदी मुर्मू यांचं नाव चर्चेत होतं. मात्र, भाजपनं त्यावेळी रामनाथ कोविंद यांना उमेदवारी दिली होती.

एकनाथ शिंदे काय निर्णय घेणार?, ठाणे जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे वेट अँड वॉच
द्रौपदी मुर्मू यांनी त्यांचं जीवन समाजाच्या सेवेसाठी आणि गरिबांना बळ देण्यासाठी समर्पित केलं आहे. मागास आणि प्रगतीपासून वंचित राहिलेल्या समाज घटकाच्या प्रगतीसाठी द्रौपदी मुर्मू यांनी कार्य केलं आहे. द्रौपदी मुर्मू यांना प्रशासनाचा अनुभव आहे. भारताच्या त्या महान राष्ट्रपती ठरतील,असं नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.
महाराष्ट्राचं सत्तानाट्य कर्नाटक मध्यप्रदेशच्या वाटेवर?

AdvertisementSource link

Advertisement