‘बोलो जुबां केसरी’ स्टेडियमध्ये गुटखा खात असतानाचा क्रिकेट फॅन्सचा व्हिडीओ व्हायरल; नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया


सामन्यादरम्यान गुटखा खात असतानाचा क्रिकेट फॅन्सचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यावरून नेटकरी भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत.

Advertisement

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यादरम्यान, स्क्रीनवर असे काहीतरी दिसले, ज्यानंतर नेटीझन्स कानपूर शहराबद्दल जोरदार मीम्स बनवत आहेत.

नक्की काय झाले?

झाले असे की कॅमेरा प्रेक्षक गॅलरीत बसलेल्या चाहत्यांकडे गेला. कानपूरच्या मैदानावर आलेले चाहते भारतीय खेळाडूंचा जल्लोष करताना दिसले.त्याची झलक कॅमेऱ्याच्या माध्यमातून टीव्हीवर आल्याने लोकांना आनंद झाला. इथेच कॅमेऱ्याने असे काही दाखवले जे कानपूरच्या लोकांना फारसे आवडले नाही. एक व्यक्ती तोंडात काही पदार्थ टाकून सामन्याचा आनंद घेताना कॅमेऱ्यात कैद झाला. तो गुटखा खात असल्याचे प्रथमदर्शनी दिसत होते.

Advertisement

( हे ही वाचा: IND vs NZ: सामना सुरु असतानाच प्रेक्षकांकडून ‘पाकिस्तान मुर्दाबाद’च्या घोषणा!; पहा व्हिडीओ )

( हे ही वाचा: Video: श्रीकृष्णाच्या मूर्तीचा मोडला हात, पुजारी रडत डॉक्टरकडे पोहोचला आणि मग…)

Advertisement

मग काय होतं, तोंडात गुटखा घेऊन आलेल्या या व्यक्तीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यावर यूजर्स आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. फोटो शेअर करताना एका यूजरने लिहिले की, ‘वेलकम टू कानपूर.’ त्याचवेळी आणखी एका युजरने मीमच्या माध्यमातून गुटखा तोंडात थुंकणाऱ्या व्यक्तीला गुटखा थुंकण्यास सांगितले.

( हे ही वाचा: IND vs NZ: कसोटीत मालिकेत श्रेयस अय्यरचे पदार्पण, सुनील गावस्करकांडून मिळाली कॅप; खास क्षण कैमेऱ्यात कैद )

Advertisement

दुसरीकडे, सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, टीम इंडियाचा कर्णधार अजिंक्य रहाणेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीच्या धक्क्यांनंतर टीम इंडियाचा डाव सावरला आणि श्रेयस अय्यर आणि रवींद्र जडेजा यांनी मिळून टीम इंडियाची धावसंख्या २५० पर्यंत नेली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

AdvertisementSource link

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here