बेरोजगारांची तलाठी भरतीच्या नावाने फसवणूक, विजय वडेट्टीवारांचा आरोप: म्हणाले, तमशा चाललाय का‌? पैसे कोणाच्या खात्यात जातात?

बेरोजगारांची तलाठी भरतीच्या नावाने फसवणूक, विजय वडेट्टीवारांचा आरोप: म्हणाले, तमशा चाललाय का‌? पैसे कोणाच्या खात्यात जातात?


मुंबईएका तासापूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

तलाठी भरतीच्या नावखाली राज्यात बेरोजगार तरुणांची शासन फसवणूक करत असल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. भरतीच्या नावाखालील हजार-हजार रुपये जमा केले जात आहेत. हे पैसे कोणाच्या खात्यात जातात? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. राज्यात शासनाला निट परीक्षाही घेत नसल्याचा आरोपही त्यांनी केला.

Advertisement

राज्यभरातील तलाठी भरती परीक्षेंच्या केंद्रावर सर्व्हर डाऊन झाल्याने विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यावर विधान सभेतील विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवर यांनी देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. अशा सावळ्या गोंधळामुळे एखाद्या विद्यार्थ्याचा जीव गेला तर त्याला सर्वस्वी जबाबदार सरकार असेल, अहेही ते म्हणाले.

विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबत हे सरकार गंभीर नाही

Advertisement

सर्व्हर डाऊन झाल्यामुळे तलाठी भरती परीक्षेसाठी लांबचा प्रवास करून परीक्षा केंद्रावर पोहोचलेल्या लाखो विद्यार्थ्यांना आज प्रचंड मनस्ताप व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. शेतकरी, कष्टकरी व गोरगरिबांच्या मुलांकडून परीक्षेच्या नावावर सरकारने 1000 रुपये शुल्क आकारणी करायची, दूरचे परीक्षा केंद्र द्यायचे आणि वरून विद्यार्थ्यांचे मानसिक खच्चीकरण होईल असे व्यवस्थापन करायचे हा धंदाच या सरकारने सुरू केला आहे. राज्यातील विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबत हे सरकार गंभीर नाही ही बाब आता विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना स्पष्ट झाली आहे.

रात्री 11.40 वाजता दोन विशेष बस नागपूरसाठी सोडल्या; अशोक चव्हाण यांची माहिती

Advertisement

आज तलाठी भरती व सीटीईटीची परीक्षा होती. नांदेड जिल्ह्यातील शेकडो विद्यार्थ्यांना नागपूर हे केंद्र मिळाले होते. नागपूर जाण्यासाठी काल रात्री मोठ्या संख्येने विद्यार्थी नांदेड बसस्थानकावर एकत्रित झाले होते. मात्र, नांदेड मार्गे जाणारी सोलापूर-नागपूर ही रात्री 9 वाजता येणारी बस 11 वाजेपर्यंतही आली नाही. नागपूरला सकाळीच पोहोचणे आवश्यक असल्याने विष्णू कदम नामक विद्यार्थ्याने एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष शशिकांत क्षीरसागर पाटील यांना फोन करून अडचण सांगितली. दुसऱ्याच क्षणी त्यांनी मला ही माहिती कळवली. त्यानंतर मी आगारप्रमुख कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला. परिस्थितीचे गांभिर्य व तातडीने बस सोडण्याची आवश्यकता पाहता त्यांनीही तत्परतेने पावले उचलून रात्री 11.40 वाजता दोन विशेष बस नागपूरसाठी सोडल्या. परिवहन मंडळाचे अधिकारी आणि एनएसयुआय पदाधिकाऱ्यांनी विनाविलंब सहकार्य केल्यामुळे आम्ही वेळेत परीक्षा केंद्रावर हजर राहू शकलो, अशी भावना नांदेड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी व्यक्त केली असल्याची माहिती माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी दिली.
या संदर्भातील खालील बातमी देखील वाचा…

तलाठी पदाच्या परीक्षेत सावळा गोंधळ, परीक्षेच्या आधी सर्व्हर डाऊन:प्रशासकीय व्यवस्था गंभीर नाही का? विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संताप

Advertisement

राज्यभरात तलाठी पदाच्या परीक्षा सुरू असून त्या आधी सर्व्हर डाऊन झाल्याने विद्यार्थ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या सर्वांमुळे विद्यार्थी आक्रमक झाले असून राज्यातील जवळपास सर्वच ठिकाणी अशा प्रकारची परिस्थिती असल्याचे चित्र आहे. नागपूर, अमरावती, अकोला, लातूर आदी ठिकाणी विद्यार्थ्यांनी प्रशासनाविरोधात तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. तसेच परीक्षा केंद्रावर गोंधळ घातला. पूर्ण बातमी वाचा…Source link

Advertisement