नाशिक32 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
इगतपुरी तालुक्यातील नांदगाव सदो येथील राहाणारा भुषण गणेश भागडे वय 23 या युवकाचा मृतदेह इगतपुरी शिवारातील समृद्धी महामार्गावरील एका विहिरीत संशयास्पद आढळून आल्याने खळबळ उडाली. मृताच्या कमरेला पोत्यात दगड बांधलेले गोणी असल्याने हा घात की अपघात असा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. इगतपुरी पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा केला असून पुढील तपास सुरु आहेे.
पोलिसांनी दिलेली माहिती आणि गणेश भागडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, 15 जानेवारी रोजी भुषण भागडे वय 23 हा समृद्धी महामार्गावर मजुरीच्या कामाला जात असल्याचे सांगून दुचाकी घेऊन घरातून बाहेर पडला होता. त्याला फोन केला तर फोन बंद लागला. मोबाईल बंद झाला असेल म्हणून नंतर फोन केला नाही.कामावरुन घरी आला नाही म्हणून दि. 16 रोजी सकाळी 8 वाजता त्याचा मित्र कैलास यास फोन केला भुषण घरी आला नाही म्हणून सांगतीले. कैलासनेही भुषण कालपासून कामावर आलेला नाही असे सांगीतले. त्याचा इगतपुरी शिवारातील समृद्धी महामार्ग परिसरातील गावामध्ये शोध घेतला मात्र तो मिळून आला नाही.
इगतपुरी पोलिस ठाण्यात मिसिंगची तक्रार दिली. शुक्रवारी सकाळी समृद्धी महामार्गावरील इगतपुरी शिवारात एक मृतदेह विहिरीत तरंगत असल्याचे परिसरातील शेतकऱ्यांच्या लक्षात आले. गावचे पोलिस पाटील यांना कळवण्यात आले. पाेलीस पाटीलांना इगतपुरी पोलिसांना कळवले. पोलिस घटनास्थळी दाखल झाले. जेसीबीच्या साह्याने मृतदेह बाहेर काढण्यात आला. मृतदेहाच्या कंबरेला गोणीत दगड बांधल्याचे निदर्शनास आले.
पोलिसांनी प्रथमदर्शनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून नातेवाईकांना हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात आणन्यात आला आहे. शवविच्छेदन अहवालानंतर हा घात की अपघात याचा उलगडा होणार आहे. काही दिवसांपूर्वी भुषणचे लग्न ठरले होते. मनमिळाऊ स्वाभाव असल्याने त्याच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. इगतपुरी पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला असून संपर्कात असलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू करण्यात आली आहे.