बॅनरबाजी: आदित्य ठाकरे ‘भावी मुख्यमंत्री’! नागपुरात झळकले पोस्टर्स, राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या


नागपूरएका तासापूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

कोराडी वीज प्रकल्पाच्या आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी नागपुरात दाखल झालेल्या आदित्य ठाकरेंचे शहरात ‘भावी मुख्यमंत्री’चे पोस्टर झळकले आहेत. अजित पवार, फडणवीसांच्या पोस्टरबाजीच्या रांगेत आता आदित्य ठाकरेही जाऊन बसल्याच्या चर्चा आहेत.

Advertisement

युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी लावलेल्या बॅनरची राज्यभर चर्चा असून राष्ट्रवादी, भाजपच्या बॅनरबाजीच्या स्पर्धेत युवासेनाही उतरल्याचे चित्र आहे.

बॅनरने वेधले शहरवासियांचे लक्ष

Advertisement

नागपूरच्या रामटेक आणि कन्हान येथील रस्त्यांवर आणि बस स्टॉपवर हे पोस्टर्स लागले आहेत. त्यावर भावी मुख्यमंत्री आदित्य ठाकरे साहेब, आपले रामटेक विधानसभा मतदारसंघात हार्दिक स्वागत, असा मजकूर या पोस्टर्सवर आहे. ठाकरे गटाचे युवा सेना जिल्हाप्रमुख लोकेश बावनकर आणि उपजिल्हाप्रमुख समीर मेश्राम यांनी हे पोस्टर्स लावले आहेत. या पोस्टर्सवर बावनकर आणि मेश्राम यांचेही फोटो आहेत. तसेच शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचेही या पोस्टर्सवर फोटो आहेत. हे पोस्टर्स सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. तसेच या पोस्टर्सवरील मजकुरामुळे सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

याआधी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांचे ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून पोस्टर्स झळकले होते. देवेंद्र फडणवीस यांचेही नागपूरात असेच पोस्टर झळकले होते. यावेळी उलटसुलट चर्चा होत असताना बॅनरबाजीच्या शर्यतीत आता युवासेनाही उतरली आहे.

Advertisement

आदित्य ठाकरेंचा नागपूर दौरा

कोराडी वीज प्रकल्पाविरोधात नागपूरमधील स्थानिकांनी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलकांशी, गावकऱ्यांशी आणि पर्यावरणप्रेमींशी चर्चा करण्यासाठी आदित्य ठाकरे नागपूरमध्ये दाखल झाले आहेत. कोराडी परिसरातील नांदगाव, वराडा येथील गावांना ते भेटी देणार असून गावकरी आणि शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.

Advertisement

संबंधित वृत्त

प्रकरण तापणार:कोराडी वीज प्रकल्पाविराेधात स्थानिकांनी ठोकला शड्डू, आदित्य ठाकरे आज नागपूरात, आंदोलकांशी करणार चर्चा

Advertisement

कोराडी औष्णिक वीज प्रकल्पाविरोधात नागपूरच्या स्थानिकांनी आंदोलनास सुरुवात केली आहे. या वादात आदित्य ठाकरेंनी उडी घेतली असून आज ते नागपूर दौऱ्यावर जाणार आहेत. वाचा सविस्तर​​​​​​​



Source link

Advertisement