बुलेट स्टंट: ‘खलनायक’ गाण्यावर पिस्तुल दाखवत बुलेट स्टंट; पोलिसांनी अटक केल्यानंतर मागितली माफी, पाहा व्हिडिओ  • Marathi News
  • National
  • Bullet Stunt Surat | Marathi News | Bullet Stunt With Pistol On The Song ‘Kahalyak’; Police Apologize After Arrest, See Video

Advertisement

सुरत11 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

गुजरातच्या सुरतमधील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्या व्हिडिओमध्ये दोन तरुण बुलेटवर स्टंट करताना पाहायला मिळत आहेत. त्यात एका जणाच्या हातात पिस्तुल देखील दिसत आहे. सोशल मीडियावर या बुलेटराजाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

Advertisement

सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडिओ डिसेंबरमधला
गुजरातच्या सुरतमध्ये दोन तरुण आपल्या बुलेटगाडीवर स्टंट करताना पाहायला मिळत आहे. व्हिडिओत जर आपण बघितले तर असे दिसते की, एक तरुण बुलेट चालवत आहे. तर दुसरा तरुण बुलेट चालवणाऱ्या तरुणाच्या खाद्यांवर बसला आहे. त्याच्याकडे पिस्तुल देखील असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. तर दोघेही सिगारेटचा देखील आनंद घेताना पाहायला मिळत आहे. सोबतच त्यांच्या मोबाईलमध्ये ‘नायक नही खलनायक हू मै’ हे गाणा वाजताना ऐकू येत आहे. हा व्हिडिओ 14 डिसेंबर रोजीचा असल्याचे सांगितले जात आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या दोघांना बेड्या ठोकल्या आहे.

पोलिसांनी केली अटक
सदरील व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी अॅक्शन घेतली आहे. राज्याचे गृहराज्य मंत्री हर्ष संघवी यांनी ट्विट करत सांगितले आहे की, दोन्ही बुलेटवर मस्ती करणाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे. हा व्हिडिओ 14 डिसेंबर रोजीचा आहे. फोटोत दोघेही माफी मागताना दिसत आहे.

Advertisement

बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement