बी. रघुनाथ पुरस्कार पत्रकार ‎श्रीकांत सराफ यांना प्रदान‎: सराफ यांच्या ‘तितर-बितर’‎कादंबरीला सन्मान

बी. रघुनाथ पुरस्कार पत्रकार ‎श्रीकांत सराफ यांना प्रदान‎: सराफ यांच्या ‘तितर-बितर’‎कादंबरीला सन्मान


छत्रपती संभाजीनगर44 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

लेखक वासुदेव मुलाटे यांच्या हस्ते श्रीकांत सराफ यांनी पुरस्कार स्वीकारला.‎

ज्येष्ठ मराठी लेखक कै. बी. रघुनाथ ‎यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने बी.‎रघुनाथ स्मृती सोहळ्याचे आयोजन‎ शनिवारी (9 सप्टेंबर) तापडिया‎नाट्य मंदिरात करण्यात आले होते. या‎वेळी पत्रकार श्रीकांत सराफ यांना बी.‎रघुनाथ पुरस्काराने सन्मानित करण्यात‎आले. त्यांच्या ‘तितर-बितर’‎कादंबरीला हा पुरस्कार घोषित‎ करण्यात आला होता.

Advertisement

देशमुख आणि‎कंपनी पुणे यांच्या वतीने ही कादंबरी‎प्रकाशित करण्यात आली. सराफ‎यांची यापूर्वी //”बोभाटा” ही कादंबरी‎प्रकाशित झाली आहे. एकांकिका,‎प्रहसने, नाटक, पथनाट्य, बालनाट्य‎यांचे लिखाणही त्यांनी केले आहे.‎गेली 30 वर्षे श्रीकांत सराफ पत्रकार ‎म्हणून छत्रपती संभाजीनगरात कार्यरत‎ आहेत. पुरस्कार सोहळ्याला प्रसिद्ध‎लेखक प्रा. डॉ. वासुदेव मुलाटे यांची ‎उपस्थिती होती. पत्रकार-लेखक शरद ‎देऊळगावकर, ज्येष्ठ विधिज्ञ ॲड.‎अनंत उमरीकर, नाटककार-लेखक‎हनुमानदास वर्मा, लेखिका प्रा. डॉ.‎मंगला वैष्णव या चार परभणीकरांचा‎सत्कार झाला.‎

Advertisement



Source link

Advertisement