बीडीएसमध्ये शगुन प्रथम: शगुन सोनी बीडीएस जनरल सर्जरीत राज्यात प्रथम, वैद्यकीय क्षेत्रात हिंगोलीचे नाव झळकले; शगुनवर शुभेच्छांचा वर्षाव


  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • BDS | Exam | Shagun Soni First In The State In BDS General Surgery, Hingoli’s Name Flashed In The Medical Field; Good Luck

Advertisement

हिंगोली25 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

हिंगोली येथील हेडगेवार दंत महाविद्यालयाची विद्यार्थीनी शगुन सत्यानारायण सोनी हिने बीडीएस तृतीय वर्षाच्या जनरल सर्जरी या विषयात राज्यात पहिला क्रमांक तर बीडीएस तृतीय वर्षात राज्यात चौथा क्रमांक मिळविला आहे. तिच्या यशामुळे आता वैद्यकीय अभ्यासक्रमातही हिंगोलीचे नाव राज्यात झळकले आहे.

Advertisement

नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्यावतीने या परिक्षांचे आयोजन करण्यात येते. राज्यभरातील दंत महाविद्यालयातील विद्यार्थी ही परिक्षा देत असतात. या परिक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे असून, त्यात बीडीएस तृतीय वर्षाच्या जनरल सर्जरी या विषयात शगुन सोनी या विद्यार्थीने 200 पैकी 165 गुण मिळवून राज्यात पहिला क्रमांक मिळविला आहे. तर बीडीएस तृतीय वर्षात 600 पैकी 467 गुण मिळवून राज्यात चौथा क्रमांक पटकवला आहे.

शगुन सोनी हिच्या यशाने हिंगोलीची विद्यार्थीनी प्रथमच राज्यस्तरावर झळकली आहे. बीडीएस पुर्ण केल्यानंतर पुढे पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा तिचा मानस आहे. तिच्या यशाबद्दल दंत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विवेक चौकसे, डॉ. सुधीर भगत, डॉ. सत्यनारायण सोनी, डॉ. उमा सोनी, डॉ. राशी सोनी यांच्यासह वैद्यकिय क्षेत्रातील तज्ज्ञांसह नागरिकांनी तिचे अभिनंदन केले आहे.

Advertisement

बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here