(बीएड) शैक्षणिक वर्षातील प्रवेश प्रक्रिया पूर्ण: राज्यात 5,696 तर खान्देशात 150 जागा रिक्त; किचकट प्रवेश प्रक्रियेमुळे विद्यार्थी वंचीत


जळगाव17 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

अध्यापक पदवी अभ्यासक्रमाची (बीएड) 2022-23 या शैक्षणिक वर्षातील प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली असून, 2 जानेवारीपासून तासिकांनाही सुरुवात झाली आहे. मात्र सीईटी सेलने यंदा किचकट प्रकारे प्रवेश प्रक्रिया केल्यामुळे राज्यात 5,696 तर जळगाव, धुळे व नंदुरबार या तीन जिल्ह्यातील बीएडच्या महाविद्यालयांमध्ये 925 एकूण जागा आहेत.

Advertisement

त्यापैकी सुमारे 150 जागा रिक्त राहिल्या आहेत. तर दुसरीकडे काही ठराविक व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी शासनाने दोन-तीनवेळा मुदतवाढ देऊन प्रवेश संख्या वाढवण्याकडे कल ठेवला होता.

बीएडच्या प्रवेशासाठी अनेक महाविद्यालयांनी सीईटी सेलशी संपर्क साधला असता फारसा प्रतिसाद मिळाला नाही, किंवा मुदतवाढही मिळाली नाही, त्यामुळे या जागा रिक्त राहिल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगीतले. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडून यंदा बीएड अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला उशीर झाला. सुमारे सात महिने ही प्रवेश प्रक्रिया सुरू होती. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रिया अर्ध्यातून सोडून इतर अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊन मोकळे झाले. संस्था स्तरावरील फेरीत अनेक विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणी आल्याच्या तक्रारी महाविद्यालयांकडे आल्या होत्या. तसेच संस्था स्तरावरील फेरीसाठी एकच दिवस देण्यात आला होता. परंतु त्याची माहिती विद्यार्थ्यांना मिळाली नसल्याचे शिक्षक, प्राचार्यांनी सांगितले.

Advertisement

प्रवेशासाठी रिक्त जागांनुसार अनेक विद्यार्थ्यांनी कागदपत्रे सादर करण्याचा प्रयत्न केला, परंतु तांत्रिक अडचणी आल्या. काहींना याबाबत वेळेत माहितीच मिळाली नाही. त्यामुळे प्रक्रियेत सहभागी न झालेल्या अनेक विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात येऊन चौकशी केली. परंतु प्रक्रिया आता पूर्ण झाल्याचे सीईटी सेलकडून सांगण्यात आले. अनेक विद्यार्थ्यांनी सीईटी सेलशी संपर्क केला. परंतु मुदतवाढ मिळाली नाही. रिक्त जागा असूनही बीएड महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थी संख्या कमी होती.

राज्य शासनाने यंदा अपेक्षीत प्रवेश संख्या न मिळाल्यामुळे इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या (इग्नु), यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठा, फार्मसीच्या प्रवेश प्रक्रियेस तीन वेळा मुदतवाढ दिली. या शिवाय राजश्री शाहु महाराज शिष्यवृत्ती, पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षांच्या अर्ज भरण्यासही मुदतवाढ दिली आहे. परंतु बीएडसाठी मुदतवाढ न दिल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे.

Advertisement

बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement