नाशिक3 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
राष्ट्र निर्माण प्रक्रियेमध्ये सर्व पायाभूत प्रकल्प , रस्ते, धरणे , विद्युत प्रकल्प , शासकीय इमारती यांच्या उभारणी मध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या बिल्डर्स असोसिअशन ऑफ इंडियाच्या (बीएआय) नाशिक शाखेद्वारे बिल्डर्स डे साजरा करण्यात आला.
या प्रसंगी बांधकाम व निर्माण क्षेत्रातील अर्ध्वयू तसेच अनेक महत्वाच्या शासकीय प्रकल्पाच्या निर्माणामध्ये मोलाची भूमिका बजावणारया नाशिकच्या मदन जगोटा यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. याच प्रसंगी उत्कृष्ट लेबर कंत्राटदार म्हणून बाबुभाई दंड यांचा देखील गौरव करण्यात आला.
बिल्डर्स डे निमित्ताने आयोजित कार्यक्रमात त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. या प्रसंगी व्यासपीठावर बीएआयचे राष्ट्रीय अध्यक्ष निमेशभाई पटेल, उपाध्यक्ष राजेंद्र आठवले, महाराष्ट्र बीएआयचे अध्यक्ष दत्तात्रय मुळे ,नाशिक बीएआयचे अध्यक्ष अभय चोकसी, सचिव विजय बाविस्कर , ,माजी राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश पाटील व संयोजन समिती प्रमुख राजेंद्र मुथा, बीएआय युथ विंग नाशिक चे अध्यक्ष अविष्कार बिरारी हे मान्यवर उपस्थित होते .
कार्यक्रमाची सुरुवात अभिनव पद्दतीने म्हणजे एका रोपट्याला पाणी देऊन करण्यात करण्यात आली. स्वागतपर भाषणात बोलताना नाशिक बीएआयचे अध्यक्ष अभय चोकसी म्हणाले की, बीएआय हि बांधकाम कंत्राटदार आणि व्यवसायिक यांची देशपातळीवरील शिखर संस्था असून यांची स्थापना 1941 या वर्षी करण्यात आली. आजमितीला 160 शाखांमधून याचे काम चालते. जीवन गौरव पुरस्कार हा दर दोन वर्षांनी देण्यात येत असून माझ्या कार्यकाळात हा पुरस्कार आमच्या क्षेत्रातील पथदर्शक अश्या व्यक्तीमत्वास देत असल्याचा मला आनंद आहे असेही त्यांनी नमूद केले.
महिला विभाग स्फूर्तीचा पदग्रहण समारंभ झाला यावेळी नूतन अध्यक्षा म्हणून प्रतिभा शिरसाठ यांनी आपल्या कार्यकारिणी सोबत पदभार स्वीकारला.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे बीएआयचे राष्ट्रीय अध्यक्ष निमेशभाई पटेल म्हणाले की, नाशिक शहर हे देशातील वेगाने वाढणारे शहर असून बांधकाम व्यावसायिक येथे सचोटीने कार्य करत आहे. सर्वात जुनी संस्था असल्याने सरकारच्या अनेक धोरणात्मक निर्णय प्रक्रियेमध्ये बीएआय महत्वाची भूमिका बजावते.
संयोजन समिती प्रमुख राजेंद्र मुथा यांनी पुरस्कार्थी यांच्या निवडी मागील संकल्पना विषद केली. बीएआयतर्फे टेक्नो लीगल सेलची देखील स्थापना करण्यात आली असून सदस्य म्हणून इंजि .अँड. सुधीर देशमुख आणि इंजि .अँड.मोहन रानडे यांची नियुक्ती करण्यात आली.