छत्रपती संभाजीनगर18 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
भारतीय राष्ट्रीय समितीने (बीआरएस) आता महाराष्ट्र राज्यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी समितीच्या संघटना बांधणीला वेग आला आहे. सरचिटणीस हिमांशू त्रिवेदी यांनी प्राथमिक आढावा घेतला. प्रमुख पदाधिकारी चांगल्या लोकप्रतिनिधींचा शोध घेऊन त्यांच्याशी थेट संवाद साधत असून त्यांना पक्षात येण्यासाठी निमंत्रण दिले जात आहे. समितीचे प्रमुख तथा तेलंगणचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी काही प्रमुख नेत्यांच्या भेटी घेतल्या आहेत. फोनवरून पक्ष प्रवेशासाठी निमंत्रण दिले जात आहे. सरचिटणीस हिमांशू त्रिवेदी यांनी नुकतेच शहरात येऊन गेले. त्यानंतर दोन दिवसांनी रविवारी संत एकनाथ नाट्यगृहात संघटना बांधणीसाठी बैठक पार पाडली. बैठकीत काही प्रवेश झाले आहेत. आपच्या नेत्यांचा ओढा : बीआरएसमध्ये प्रवेश करण्याकडे आम आदमी पक्षातील (आप) नेते, पदाधिकाऱ्यांचा ओढा असल्याचे चित्र आहे. ‘आप’च्या पदाधिकाऱ्यांना प्रचार व प्रसारासाठी पैशांची निकड असते. मात्र, त्यांना फंड उपलब्ध करून दिला जात नाही. स्वत:च्या खिशातून पैसे खर्च करणे पदाधिकाऱ्यांना परवडत नाही. दुसरे म्हणजे वरिष्ठ पदाधिकारी संघटना बांधणीसाठी प्रयत्न करत नाहीत. जिल्हाध्यक्ष रघुनाथ पाटील यांच्यासह अनेकांनी पदाचा राजीनामा दिला आहे. याचबरोबर संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारीही बीआरएसच्या गळाला लागले . दोन लाखांचे विमा संरक्षण : तेलंगणमध्ये बीआरएसने सक्रिय कार्यकर्त्यांचा व पदाधिकाऱ्यांचा विमा उतरवून त्यांना दोन लाख रुपयांचे संरक्षण कवच दिले आहे. अशा प्रकारे विमा कवच देणारा हा पहिला पक्ष असल्याचा दावा सरचिटणीस हिमांशू त्रिवेदी यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना केला.