बिल्डरांच्या डोक्यावर कर्ज असते तर माफ झाले असते: आदित्य ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर; म्हणाले, सरकारला मदत करण्यास भाग पाडू

बिल्डरांच्या डोक्यावर कर्ज असते तर माफ झाले असते: आदित्य ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर; म्हणाले, सरकारला मदत करण्यास भाग पाडू


छत्रपती संभाजीनगर26 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

शेतकऱ्यांनो धीर सोडू नका, आम्ही तुमच्या समवेत आहोत, असा विश्वास युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आदित्य ठाकरे हे मराठवाडम्याच्या दौऱ्यावर आले आहेत. या वेळी त्यांनी कापूस, टोमॅटो, मोसंबी, सोयाबीन उत्पादक दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची बांधावर भेट घेतली. तसेच त्यांना दिलासा दिला. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या निर्णयावरही त्यांनी राज्य सरकारवर आरोप केले. हे बिल्डरांचे सरकार आहे. त्यांच्या डोक्यावर कर्ज असते तर ते माफ झाले असते. मात्र, शेतकऱ्यांसाठी सरकारला वेळ नसल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

Advertisement

या आधीचे कृषी मंत्री कधीच बांधावर जात नव्हते. आताचे कृषीमंत्रीही जातील असे वाटत नाही. मात्र, शेतकऱ्यांचा बांधावर जाण्याचा प्रश्न नाही. सरकार शेतकऱ्यांसाठी किती संवेदनशील आहे, हे महत्त्वाचे आहे. जे खुर्चीत बसले आहे, त्यांना केवळ उद्योजक, बिल्डरांची काळजी आहे. त्यांना शेतकऱ्यांची काळजी नाही. सध्या शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. मात्र, हेच कर्ज जर बिल्डर, उद्योजकांच्या डोक्यावर असते तर ते राज्य सरकारने माफ केले असते. असा आरोपही आमदार आदित्य ठाकरे यांनी केला.

नियम बदलण्याची आवश्यकता
शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी नियमात अनेक बदल करण्याची आवश्यकता असल्याचे मत आमदार आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले आहे. पिक विमा काढल्यानंतरही शेतकऱ्यांना मदत मिळत नसल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे. दुष्काळ जाहीर करण्यासाठी देखील काही नियम योग्य नसल्याने त्यांच्यातही बदल करणे आवश्यक असल्याचे मत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.

Advertisement

सरकार कोणाचेच ऐकत नाही

सध्याचे राज्य सरकार कोणाचे ऐकते हा खरा प्रश्न असल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सरकार समोर मांडणार आहात का? असा प्रश्न आदित्य ठाकरे यांना विचारला होता. यावर आदित्य ठाकरे म्हणाले की, मी जर उद्योजक, बिल्डर असतो तर सरकारने माझे ऐकले असते. पण मी एका सादा आमदार आहे. त्यामुळे सरकार माझे ऐकत नाही. हे सरकार केवळ उद्योजक आणि बिल्डरांचे असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे. यावेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार उदयसिंह राजपूत, जिल्हाप्रमुख राजेंद्र राठोड आदी उपस्थित होते.

AdvertisementSource link

Advertisement